सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा ८ मे २०१८ रोजी मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला होता. सोमवारी, लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त सोनम कपूरने नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने नवऱ्याला उद्देशून लहानसे पत्रसुद्धा लिहिले आहे.

सोनमच्या लग्नाला जरी पाच वर्षे पूर्ण झाली असली, तरीही तिने या पत्रात ‘माझ्या आयुष्याची सुंदर सात वर्ष’ असा उल्लेख केला आहे. कारण, २०१८ मध्ये लग्नगाठ बांधण्यापूर्वी सोनम आणि आनंदने एकमेकांना जवळपास दोन वर्षे डेट केले होते.

सोनम कपूर नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना लिहिते की, “आज आपल्या लग्नाचा वाढदिवस! माझे नशीब चांगले म्हणून, तुझ्यासारखा प्रेमळ जोडीदार मला मिळाला. ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर सात वर्षं होती. या सात वर्षांत आपल्या कधीही न संपणाऱ्या गप्पा, लाफ्टर, लॉंग ड्राईव्ह, एकत्र प्रवास, एकमेकांसोबत घालवलेला वेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला मुलगा वायू. हे सारे काही मी अनुभवले. ‘लव्ह यू माय जान’… मी कायम तुझी गर्लफ्रेंड, तुझी सर्वात चांगली मैत्रीण आणि बायको म्हणून तुझ्यासोबत आहे. तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस सुंदर आहे.”

हेही वाचा : “शाहिदमुळे मी कोणाच्या प्रेमात नाही पडले, त्याचे लग्न झाले तेव्हा खूप…” उर्फी जावेदची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत

सोनमने केलेल्या या पोस्टवर पती आनंद आहुजाने मजेशीर कमेंट केली आहे. यात तो म्हणतो, “मी आज एका मुलाचा बाप आहे आणि आज मला बायकोपण आहे आणि गर्लफ्रेंडसुद्धा… माझे नशीब!फरक एवढाच आहे की, या दोन्ही व्यक्ती एकच आहेत. तुला खूप प्रेम सोनम.” या जोडप्याला जवळच्या मित्रांसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सोनम कपूरची आई सुनीता कपूर यांनीही मुलगी आणि जावयाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत, “तुमचे प्रेम असेच बहरत राहो,” अशा शुभेच्छा त्यांनी या जोडप्याला दिल्या आहेत.

हेही वाचा : रितेशचा पी. व्ही. सिंधूसोबतचा व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क! नेटकरी म्हणतात, “तू ऑल राऊंडर आहेस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.