Sonu Sood gives wife Sonali Sood Health Update: अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद (Sonali Sood Accident) हिचा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात सोनाली व तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. या दोघांवर नागपुरातील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनालीची प्रकृती आता कशी आहे, यासंदर्भात तिचा पती सोनू सूदने माहिती दिली आहे.

सोनाली सूदचा अपघात झाल्यानंतर सोनू सूद नागपूरला पोहोचला आहे. तो सोनालीबरोबर रुग्णालयात आहे. सोनालीच्या प्रकृतीबद्दल चाहते चिंता व्यक्त करत होते. आता सोनूनेच पत्नीची हेल्थ अपडेट दिली आहे.

सोनू सूद सोनालीच्या अपघाताबद्दल म्हणाला..

सोनू सूदची पत्नी सोनाली सूद सोमवारी (२४ मार्च रोजी) रात्री मुंबई-नागपूर महामार्गावर वर्धा रोडवर झालेल्या एका अपघातात जखमी झाली. आता सोनूने आपल्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना अपडेट दिली आहे. “ती आता ठीक आहे. ती या भीषण अपघातातून चमत्कारिकरित्या बचावली आहे. ओम साई राम,” असं सोनू सूद इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला.

हा अपघात नागपुरात झाला. सोनाली तिच्या बहिणीचा मुलगा आणि तिची बहीण यांच्याबरोबर प्रवास करत होती. याचदरम्यान त्यांची कार एका ट्रकला धडकली, परंतु सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सोनालीच्या कारचा पुढील भाग चेंदामेंदा झाल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.

सोनाली सध्या नागपुरात आहे, तिच्यावर आणि तिच्या बहिणीच्या मुलावर उपचार सुरू आहे. अपघाताबद्दल समजताच सोनू सूद ताबडतोब नागपूरला रवाना झाला आहे. तो सकाळीच नागपुरात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सोनू सूद व सोनाली यांचं लग्न १९९६ मध्ये झालं. सोनाली ही तेलुगू आहे. ती मूळची आंध्र प्रदेशची आहे. सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ती प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. सोनाली व सोनू यांना अयान व इशांत ही दोन मुलं आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो नुकताच ‘फतेह’ चित्रपटात झळकला होता. करोना काळातील सायबर गुन्ह्यांवर आधारित हा चित्रपट होता. सध्या तो त्याच्या आगामी प्रकल्पांवर काम करतोय.