scorecardresearch

“शाहरुखचा ‘पठाण’…” बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशाबद्दल दाक्षिणात्य अभिनेत्याने केली भविष्यवाणी

चित्रपटातून जवळपास ४ वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे

“शाहरुखचा ‘पठाण’…” बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशाबद्दल दाक्षिणात्य अभिनेत्याने केली भविष्यवाणी
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी अत्यंत वाईट ठरलं आहे. यावर्षी प्रेक्षकांनी अनेक बड्या स्टारचे चित्रपट बॉयकॉट करून चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. त्यामुळे अनेक चित्रपट चांगली कमाई करू शकले नाहीत. एकीकडे दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशामागे अनेकजण तर्क लावत आहेत मात्र आता दाक्षिणात्य अभिनेत्याने आपले मत मांडले आहे.

दाक्षिणात्य अभिनेते कायमच चर्चेत असतात. पृथ्वीराज सुकुमारन दाक्षिणात्य चित्रपटातील आघाडीचा अभिनेता आहे. हा अभिनेता नुकताच एका चर्चासत्रात शाहरुख खानच्या पठाणबद्दल बोलला, ज्यावरून तो देखील शाहरुख खानचा चाहता असल्याचं दिसून येत आहे. त्याच्या मते शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे बॉलिवुडमधील दुष्काळ संपेल, असे त्याने भाकीत सांगितले आहे.

Photos : ५ हजार रुपये घेऊन भारतात आलेली नोरा फतेही, आज कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या तिची संपत्ती

पृथ्वीराज लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्याबरोबरच आता तो ”बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटात खलनायकाचा भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून जवळपास ४ वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर यशराज बॅनर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 11:36 IST

संबंधित बातम्या