शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘जवान’ चित्रपट अखेर गुरुवारी जगभरात प्रदर्शित झाला असून चित्रपटाने ग्रँड ओपनिंग केली. देशभरात चित्रपटाने ७५ कोटी रुपये कमावले. यापैकी ६५ कोटींची कमाई एकट्या हिंदी भाषेत केली. तर तमिळ व तेलुगू भाषेत चित्रपटाने प्रत्येकी ५-५ कोटी रुपये कमावले. हिंदीच्या तुलनेत दक्षिणेतील भाषेमधील कमाई खूपच कमी आहे, यावरून बॉलीवूड अभिनेता कमाल राशीद खान म्हणजेच केआरकेने हिंदी प्रेक्षकांना टोला लगावला आहे.

‘जवान’ची ग्रँड ओपनिंग! शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोडला ‘पठाण’चा रेकॉर्ड, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

“सगळ्या दाक्षिणात्य राज्यांमध्ये पहिल्या दिवशी जवान चित्रपटाने फक्त १० कोटी रुपये कमावले, हा पुरावा आहे की दाक्षिणात्य लोक बॉलीवूडचा तिरस्कार करतात. त्यांना बॉलीवूड चित्रपट पाहायला आवडत नाहीत. जवान हा चित्रपट तमिळ दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलाय आणि त्यात दिग्गज दाक्षिणात्य कलाकार आहे पण तरीही दक्षिणेतील लोकांना हा चित्रपट पाहायला नाही. दुसरीकडे हिंदी प्रेक्षक मुर्खासारखे ‘केजीएफ २’, ‘पुष्पा’, ‘बाहुबली २’ आणि ‘आरआरआर’ असे दाक्षिणात्य चित्रपट बघायला जातात.

केआरकेच्या या ट्वीटवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘केआरके खरं म्हणतोय’, ‘चित्रपटाने दाक्षिणात्य राज्यांमध्ये जास्त कमाई करायला हवी होती’, ‘सगळीकडे भेदभाव होतो’, ‘चांगले चित्रपट प्रमोट करायला पाहिजेत’, अशा कमेंट्स नेटकरी केआरकेच्या ट्वीटवर करत आहेत.

देशातच नव्हे तर परदेशातही दणक्यात सुरुवात, ‘जवान’ने पहिल्याच दिवशी जगभरात कमावले तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जवान’बद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटात शाहरुख खानशिवाय विजय सेतुपती, नयनतारा, प्रियामणी, गिरीजा ओक, रिद्धी डोग्रा, दीपिका पदुकोणच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक अॅटलीने केलं आहे.