Kiara Siddharth Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडयावर सातत्याने चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या काही काळापासून होताना दिसत होत्या. आता अखेर ७ फेब्रुवारी रोजी ते लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या बातमीने फक्त त्यांचे चाहतेच नाही तर बॉलिवूड कलाकारही आनंदी झाले आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे.

या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सनाही आमंत्रित केलं गेलं असल्याची चर्चा आहे. मीडिया रीपोर्टनुसार या सोहळ्यात या दोघांनी मोजक्याच लोकांना निमंत्रण दिलेलं आहे. तसेच विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाप्रमाणे अत्यंत गुप्त पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : “…यामुळे माझ्या हातून हॉलिवूडचा ‘तो’ चित्रपट निसटला”; रॉनित रॉयने लावले करण जोहरच्या टीमवर आरोप

मीडिया रीपोर्टनुसार लग्न समारंभात हजर असलेल्या लोकांना त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई केलेली आहे. शिवाय लग्नातील फोटो बाहेर लिक होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. समारंभात उपस्थित असलेल्या लोकांच्या मोबाईलसाठी एक खास कव्हरदेखील बनवण्यात आलं आहे. पाहुण्यांच्या मोबाईलला हे कव्हर लावणं बंधनकारक असणार आहे असं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर या कव्हरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मोबाईल कव्हरमधून कोणालाही सहज फोटो काढता येणार नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता लवकरच सिद्धार्थ आणि कियारा लग्नबंधनात अडकणार आहेत. गेले बरेच महीने त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. लग्नानंतर हे दोघे मुंबईत आणि दिल्लीत असं रीसेप्शन ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे. सिद्धार्थने नुकतंच त्याच्या ‘योद्धा’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे तर कियारा सध्या कार्तिक आर्यनबरोबर ‘सत्यप्रेम की कथा’ आणि राम चरणबरोबर ‘आरसी १५’ या चित्रपटांवर काम करत आहे.