बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. २४ सप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांच्या शाही लग्न सोहळा संपन्न होणार आहे. तर आता त्यांच्या विवाह स्थळाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. नुकतीच चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीयांनी सुफी नाईट एन्जॉय केली. तर आता या लग्नसोहळ्यानंतर परिणीती आणि राघव राहणार असलेल्या खोलीची किंमत समोर आली आहे.

आणखी वाचा : परिणीतीचा शाही थाट! साखरपुड्यात अभिनेत्रीने राघव चड्ढाला घातली ‘इतक्या’ किमतीची अंगठी

परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी उदयपूरचे सितारा हॉटेल बुक केलं आहे. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम लीला पॅलेस आणि उदयविलास हॉटेलमध्ये होणार असून पाहुण्यांची राहण्याची सोयाही त्याच हॉटेलमध्ये केली आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, द लीला पॅलेसमध्ये परिणीती आणि राघवसाठी महाराजा सुट बुक करण्यात आला आहे. ३६०० स्क्वेअर फुटच्या या खोलीला लेकचा व्ह्यू आहे. या आलिशान खोलीचं २४ तासांचं भाडं तब्बल १० लाख आहे.

हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राघव आणि परिणीती यांचे लग्न २३ आणि २४ सप्टेंबरला होणार आहे. २२ तारखेपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम होतील. तर २४ सप्टेंबरला ही दोघं लग्न बंधनात अडकतील.