Subhash Ghai : सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई ( Subhash Ghai ) यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने आणि त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लीलावती रुग्णालयातल्या अति दक्षता विभागात त्यांना बुधवारी ठेवण्यात आलं आणि तातडीने उपचार सुरु करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष घई ( Subhash Ghai ) यांच्यावर डॉक्टरांची एक टीम बारकाईने लक्ष ठएवून आहे. डॉ. नितीन गोखले, डॉ. जलील पारकर, डॉ. विजय चौधरी यांच्यासारखे निष्णात डॉक्टर सुभाष घई ( Subhash Ghai ) यांच्यावर उपचार करत आहेत.

लीलावती रुग्णालयातील सूत्रांनी काय माहिती दिली?

लीलावाती रुग्णालयातील सूत्रांनी SCREEN ला दिलेल्या माहितीनुसार सुभाष घई यांची प्रकृती हळूहळू सुधारते आहे. तसंच त्यांना आयसीयूतून बाहेर आणण्यात आलं आहे. दरम्यान सुभाष घई यांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली की आता सुभाष घई यांची प्रकृती ठीक आहे. सुभाष घई यांना बुधवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि वारंवार चक्कर देखील येत होती. बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करुन आयसीयूमध्ये उपचार सुरु करण्यात आले. नंतर त्यांना आयसीयूतून बाहेर आणलं गेलं असं सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कळतं आहे.

सुभाष घई यांना म्हटलं जातं शो मन

राज कपूर यांच्यानंतर हिंदी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनाही शो मन असं म्हटलं जातं. सुभाष घई यांनी कालीचरण, विधाता, कर्ज, मेरी जंग, कर्मा, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेस, ताल हे आणि असे अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००४ मध्ये रिलीज झालेल्या ऐतराजचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले नाही, परंतु त्यांनी त्या सिनेमाची निर्मिती केली होती. नुकताच सुभाष घई यांनी सिनेमाच्या सिक्वलची घोषणाही केली होती. ज्यामध्ये अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्याऐवजी ते नवीन चेहरे आणणार असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय संजय दत्तसह सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच पाहायला मिळणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सुभाष घई खलनायक २ वरही काम करत आहेत.