अभिनेत्री सुकन्या मोने यांनी गेली अनेक वर्ष विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपट, नाटक, मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात त्या झळकल्या होत्या.

सुकन्या मोने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी त्या अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनयाबरोबरच त्या नृत्यातदेखील पारंगत आहेत. नुकताच त्यांनी एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा… “नजर लागणार अशी…”, ‘ठरलं तर मग’ फेम केतकी पालवचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

सध्या ‘पुष्पा-२’ चित्रपटातील “सूसेकी” गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. इन्फ्लूएंसर्ससह अनेक कलाकार या गाण्यावर हुक स्टेप करत थिरकताना दिसतायत. अशातच आता सुकन्या या गाण्यावर थिरकल्या आहेत. गुलाबी रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये सुकन्या मोने यांचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय. सुकन्या मोने यांच्याबरोबर मधुरा जोशीदेखील थिरकली आहे. या गाण्यात “एक लाजरा न साजरा मुखडा” या मराठी गाण्याचा ट्विस्ट जोडला आहे.

हेही वाचा… वडिलांनी कायमचं मारून टाकण्याच्या आधीच आईने दिला पळून जाण्याचा सल्ला, ‘या’ अभिनेत्याने सांगितला आयुष्यातला तो कठीण प्रसंग

सुकन्या मोनेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “किती क्यूट आहात तुम्ही.” तर दुसऱ्याने “लाजवाब”, अशी कमेंट केली. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. अगदी काही वेळातच या व्हिडीओला ४८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… १४ वर्षे इंडस्ट्रीत पण ‘या’ अभिनेत्रीने कधीच नाही केलं कोणाला डेट; म्हणाली “आजच्या काळात हे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुकन्या मोने यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. तर ‘बाई गं’ या आगामी चित्रपटात त्या पाच अभिनेत्रींसह दिसणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुकन्या मोनेंसह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, नेहा खान, दिप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड या कलाकारांचाही समावेश असणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं ‘जंतर मंतर बाई गं’ नुकतंच रीलिज झालं आहे.