बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा कायमच चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनय आणि स्टंटबाजीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केले. बॉलिवूडचा अण्णा म्हणून त्याला ओळखले जाते. सुनील शेट्टीने अॅक्शन हीरो म्हणूनच बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि पुढेही त्याची हीच ओळख कायम राहिली. आज वयाची साठी ओलांडूनही सुनीलने स्वतःला अत्यंत फिट ठेवलं आहे.

बॉलिवूडच्या या लाडक्या अन्नाचा फिटनेस सध्याच्या तरुण कलाकारांनाही लाजवणारा आहे. नुकतंच सुनील शेट्टीने त्याच्या या कमालीच्या फिटनेसमागचं सीक्रेट सांगितलं आहे. इतकी वर्षं होऊनही त्याने स्वतःला एवढं फिट कसं ठेवलं आहे याबद्दल त्याने एका मुलाखतीमध्ये तरुणांना सल्ला दिला आहे.

आणखी वाचा : “मी शेतकऱ्यांच्या बाबतीत…” टोमॅटो महागाईबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुनील शेट्टीचं स्पष्टीकरण

ठरलेल्या वेळी आणि केवळ घरी बनवलेलंच खाण्याचा सल्ला सुनीलने दिला आहे. ‘न्यूज १८’शी संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणाला, “माझ्या दुपारच्या जेवणाची वेळ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ठरलेली असते, त्यात मी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करत नाही. दुपारी १ आणि संध्याकाळी ७ या जेवणाच्या वेळा मी पाळतो. मला जेव्हा सकाळी ५ वाजता सेटवर बोलावलं जातं तेव्हासुद्धा मी घरून माझा जेवणाचा डबा घेऊन जातो. नाश्ता आणि जेवण दोन्ही वेळेत होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच सुनील शेट्टी नियमित वर्क आऊटही करतो आणि त्यावेळी तो मोबाइलचा अजिबात वापर करत नाही. इतकंच नव्हे तर तर तो कुटुंबाबरोबरही पुरेसा वेळ घालवतो असंही त्याने मुलाखतीमध्ये सांगितलं. वयाच्या ३१ व्या वर्षी सुनील शेट्टीने ‘बलवान’ या चित्रपटातून दिव्या भारतीसह पदार्पण केलं. यानंतर ‘मोहरा’, ‘बॉर्डर’ ‘धडकन’, ‘हेरा फेरी’, ‘आवारा पागल दिवाना’सारख्या कित्येक हटके चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.