Sunita Ahuja Talks About Govinda : बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या पत्नी सुनीता आहुजा अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. आता नुकतच त्यांनी त्यांची जुनी अंगठी हरवल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गोविंदा त्यांना परत अशी अंगठी खरेदी करून देणार नाही असंही सांगितलं आहे.

सुनीता आहुजा अनेकदा माध्यमांशी संवाद साधताना खासगी आयुष्यातील घडामोडींबद्दल बोलत असतात. आता त्यांचं स्वत:चं यूट्यूब चॅनेल असून यामधून त्या वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आता सुनीता यांनी त्यांच्या चॅनेलवर नवीन ब्लॉग शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मुंबा देवीचं दर्शन घेतल्याचं दिसतं. परंतु, यामध्ये त्यांची अंगठी हरवल्याने त्या घाबरल्याचं दिसलं. ही अंगठी त्यांना गविंदाने त्यांच्या लग्नाच्यावेळी १९८७ मध्ये दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ब्लॉगमध्ये सुनीता यांनी त्यांची साखरपुड्याची अंगठी हरवल्यानंतर मुलाला हर्षवर्धनला फोन करून ती अंगठी त्याच्या खोलीत आहे का हे पाहायला सांगितलं आणि म्हणाल्या की, गोविंदा मला परत अशी अंगठी खरेदी करून देणार नाही. त्यानंतर शेवटी त्यांना त्यांच्या बॅगेतच ती अंगठी सापडली. त्यावेळी त्या म्हणाल्या, “देवीच्या कृपेने मला माझी अंगठी सापडली.” त्यावेळी सुनीता पुढे तेथील एका दुकानात गेल्या असताना दुकानदाराने सुनीता यांना तो गोविंदाचा खूप मोठा चाहता आहे असं सांगितलं. पुढे त्याने “मी त्यांची एक मुलाखत पाहिली, जिथे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचं कौतुक केलं,” असंही सांगितलं.

गोविंदाबद्दल सुनीता आहुजा यांची प्रतिक्रिया

दुकानदाराचं हे बोलणं एकून सुनीता म्हणाल्या, “मी त्याला मुलाखतीदरम्यान जवळपास थांबवलं होतं आणि सांगितलेलं की फक्त आई-वडिलांनीच नाही तर मीसुद्धा तुझ्यासाठी माझ्या आयुष्यातील ४० वर्ष दिली आहेत.”

दरम्यान, गोविंदाने नुकतीच काजोल व ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात हजेरी लावलेली. जिथे त्याने सुनीताबद्दल ती खूप लहान मुलासारखी आहे, जे बोलायला नाही पाहिजे तेही ती बोलून जाते, ती निरागस आहे पण तिने तिच्या जाबाबदाऱ्या पार पाडल्या असं म्हटलं.