सनी देओलच्या बहुचर्चित ‘गदर २’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी लॉन्च करण्यात आला. ‘गदर २’ च्या निमित्ताने प्रेक्षकांना २२ वर्षांनी पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिनाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ट्रेलर लॉन्चच्या भव्य कार्यक्रमाला सनी देओल आणि अमीषा अनोख्या पद्धतीने ट्रकमधून पोहोचले होते. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर सनी देओल काहीसा भावुक झाल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Gadar 2 Trailer : “…तर अर्ध्याहून जास्त पाकिस्तान खाली होईल”, ‘गदर २’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, सनी देओलच्या जबरदस्त ॲक्शनने वेधले लक्ष

तब्बल २२ वर्षांनी ‘गदर’चा सीक्वेल येणे हा फक्त चाहत्यांसाठीच नाही तर सनी देओलसाठीही खूप खास क्षण आहे. यामुळेच ट्रेलर लॉन्च कार्यक्रमामध्ये लोकांचे प्रेम पाहून सनी देओलला अश्रू अनावर झाले. सनी देओल रंगमंचावर आल्यावर चाहत्यांनी एकच जल्लोष सुरु केला. अनेक पापाराझी इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : “भारत-पाकिस्तानमधील द्वेषाचं कारण…”, गदर २ च्या ट्रेलर लाँचवेळी सनी देओलचे वक्तव्य

सनी देओलला पाहून “पाजी तुस्सी हमारी जान हो, हिंदुस्थान की शान…हिंदुस्तान झिंदाबाद” अशी घोषणाबाजी करण्यात आली. चाहत्यांचे प्रेम पाहून सनी देओल भावुक झाला. त्याने उपस्थित सर्वांचे हात जोडून आभार मानले. आपला सहकलाकार भावुक झाल्याचे पाहताच अमीषा पटेलने त्याचे डोळे पुसले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही सनी देओलचे कौतुक करत त्याला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “मित्रांनी हजारो रुपये बुडवले”, विजू मानेंच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, “रम्मीच्या डावात…”

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गदर २’ मध्ये प्रेक्षकांना सनी देओलचे जबरदस्त संवाद आणि ॲक्शन पाहायला मिळेल. सनी देओल यावेळी सकिनासाठी नव्हे तर मुलाच्या रक्षणासाठी पाकिस्तान गाठणार आहे. चित्रपटात सिम्रत कौर, मनीष वाधवा यांसारखे काही नवे कलाकार पाहायला मिळतील. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.