सनी देओलचा चित्रपट ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४० कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर सनी देओलने आपली फी वाढवल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. या चर्चांवर खुद्द सनी देओलने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानने ट्विट करीत मानले अकोलेकरांचे आभार-काय आहे कारण जाणून घ्या…

‘गदर २’ च्या यशानंतर सनी देओल आता त्याच्या चित्रपटासाठी ५० कोटी रुपये घेणार असल्याच्या बातम्या सतत येत होत्या. ज्यावर सनीने एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. एका चित्रपटासाठी ५० कोटींची मागणी करत आहात का, असा प्रश्न त्याला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. यावर सनी म्हणाला, निर्माता किती कमावतो याच्या आधारे किती पैसे द्यायचे तोच ठरवेल.

गदर २ च्या कमाईबाबत बोलायचं झालं तर या चित्रपटाने आत्तापर्यंत ५१२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने बाहुबली २ लाही मागे टाकले आहे. हिंदी भाषेत ‘पठाण’ नंतर ‘गदर २’ सर्वाधिक कमाई करणारा दुसऱा चित्रपट बनला आहे.

हेही वाचा- ‘जवान’च्या ॲडव्हान्स बुकिंगला तूफान प्रतिसाद; अवघ्या काही तासांतच बुकिंग फूल

गदर २ हा २००१ मध्ये आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. तर गदर 2 मध्ये सनी देओलसोबत अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाच्या कथेत १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे.