दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अनुज केशवानी याला ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. तीन वर्षांपूर्वी सुशांतच्या मृत्यूनंतर अनुजला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता अखेर त्याला जामीन मिळाला आहे.

करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता कसा बनला स्टार? एका वर्षी केलेले सलग ३३ फ्लॉप सिनेमे

१४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अभिनेत्याला त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून ड्रग्ज पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून केला जात आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान खार येथील रहिवासी असलेल्या केशवानीला सप्टेंबर २०२० मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

अब्जाधीश उदय कोटक यांच्या मुलाने माजी मिस इंडियाशी बांधली लग्नगाठ, शाही विवाह सोहळ्याचे फोटो आले समोर

न्यायमूर्ती एमएस कर्णिक जामीन मंजूर करताना म्हणाले, “अर्जदाराला दीर्घकाळ तुरुंगात राहावं लागलं आहे कारण याप्रकरणी सुनावणी सुरू आहे तसंच ही सुनावणी संपायला आणखी बराच वेळ लागेल. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कलम ३७ मधील तरतुदी बाजूला ठेऊन अर्जकर्त्याला जामीन देता येऊ शकतो.”

नार्कोटिक्स आणि सायकोट्रोपिक सबस्टन्स कायद्यानुसार, कलम ३७ अंतर्गत कोणत्याही आरोपीला जामीन तेव्हाच मंजूर होऊ शकतो जेव्हा न्यायालयाला प्रथमदर्शनी पुराव्यांवरुन असं वाटतं की आरोपी हा प्रकरणी दोषी नाहीये आणि जर जामीन मंजूर केला तर अशाप्रकारचा कोणताही अपराध तो करणार नाही. त्यावेळेस आरोपीला जामीन मंजूर करता येतो.

१७ वर्षांचा भाऊ गमावला, उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकले; ३३ वर्षे चाळीत राहणाऱ्या अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्यासह एकूण ३६ जणांना आरोपी करण्यात आलं होतं. रिया आणि इतर ३३ कथित आरोपींना विविध न्यायालयांनी जामीन मंजूर केला. पण एनसीबीच्या छाप्यादरम्यान केशवानीच्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले होते, त्यामुळे तो तीन वर्षे उलटूनही कोठडीत होता. अखेर कोर्टाने त्याचाही जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती कर्णिक यांनी नमूद केलं की जितेंद्र जैन या एका आरोपीला डिसेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याच आधारावर जामीन मंजूर केला होता. जैनच्या निकालाच्या आधारे, आणखी एक आरोपी मोहम्मद आझम जुम्मन शेख यालाही जामीन मंजूर करण्यात आला होता.