अभिनेत्री सुश्मिता सेनने वयाची ४५शी ओलांडली आहे. पण आजही ती बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींना सौंदर्य व फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते. योगा व नियमित व्यायाम सुश्मिता करते. आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्या अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याचा सामना करावा लागला. सुश्मिताची यादरम्यान अँजिओप्लास्टीही करण्यात आली. आता सुश्मितावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

आणखी वाचा – Video : लेकीच्या लग्नाचा आनंद गगनात मावेना, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा होणाऱ्या जावयाबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राजीव भागवत यांनी सुश्मितावर उपचार केले. याचबाबत ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही गोष्टींविषयी भाष्य केलं. ते म्हणाले, “नियमित व्यायामुळे सुश्मिता सेनचं हृदय आता निरोगी आहे. मी एवढंच सांगेन की, ती खूप नशिबवान आहे. योग्य त्यावेळी सुश्मिता योग्य त्या ठिकाणी आली”.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ अभिनेत्रीसह प्रसाद खांडेकरचा रोमँटिक डान्स, पण ‘या’ गोष्टीची सर्वाधिक चर्चा

पुढे ते म्हणाले, “तुमचं लाइफस्टाइल योग्य असेल तर हृदयविकाराचा धोका टळू शकतो. सुश्मिता नियमित व्यायाम करत होती म्हणून तिचा धोका टळला. आठवड्यातील तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक दिवस व्यायाम करू नये. व्यायामामधून शरीरालाही आराम मिळणं गरजेचं आहे. शिवाय झोपही तितकीच महत्त्वाची आहे”.

आणखी वाचा – Video : स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक

“तुम्ही सतत व्यायाम करत आहात पण तुमची झोपच होत नसेल तर यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. रात्री दोन वाजता झोपण्याची सवय, सकाळी उठल्यावर लगेचच चालायला जाण्याची सवयही आपण बदलली पाहिजे. जीममध्ये तसेच व्यायाम करताना निधन झालं अशा अनेक घटना सध्या कानावर पडतात. जीम करणं ही काही फॅशन नाही. जीमला जाण्यापूर्वी सात ते आठ तासांची झोप असणं गरजेचं आहे”. डॉक्टर राजीव भागवत यांनी आरोग्यविषयक उत्तम माहिती दिली आहे.