scorecardresearch

पाकिस्तानी लेहेंग्यावरुन ट्रोल झाल्यानंतर स्वराने शेअर केला नवा फोटो; म्हणाली “मी राणी…”

स्वराने आपल्या संगीत कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत

swara-bhasker-fahad-ahmed
स्वरा भास्कर संगीत फोटो

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चांगलीत चर्चेत आली आहे. स्वराने ६ जानेवारीला समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदबरोबर कोर्ट मॅरेज केलं. स्वराने लग्नानंतर आपल्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिसेप्शन सोहळ्यात घातलेल्या पाकिस्तानी लेहेंग्यामुळे स्वरा ट्रोलही झाली होती. आता स्वराने एक नवा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा- ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत, चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय घडलं?

स्वराने आपल्या संगीत कार्यक्रमातला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये स्वराबरोबर तिचा नवरा फहादही आहे. दोघांनीही हिरव्या रंगाचे कपडे घातले आहेत. स्वरा भास्करच्या संगीत फंक्शनचा लेहेंग्यावर भरजरी काम केले आहे. स्वराने संगीतात घातलेल्या लेहेंग्यात सिल्व्हर आणि केशरी रंगाच्या फुलांनी भरतकाम केले होते. तिने त्याच्यासोबत मॅचिंग दुपट्टा घेतलेला दिसत आहे. तर यासाठी संगीतसाठी स्वराने कोणतीही हेअरस्टाईल केली नसून तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. गळ्यात तिने एक मोठा नेकलेस कानात झुमके आणि हातात कुंदनच्या बांगड्या घालून स्वराने आपला लूक पूर्ण केला आहे. तर फहादनेही हिरव्या रंगाचे कपडे घातले होते. स्वराने संगीताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक कॅप्शन दिले आहे. डिझायनरचे आभार मानत स्वरा म्हणाली, की तिला राणी असल्यासारखं वाटत होतं.

हेही वाचा- Video : दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही इमरान हाश्मीला किस करत राहिली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, तब्बल पाच वेळा…

रिसेप्सशनच्या फोटोवरुन स्वरा ट्रोल

रिसेप्शनच्या फोटोवरुन स्वरा मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. स्वराने रिसेप्शनमध्ये पाकिस्तानी डिझायनर अली झीशानचा लेहेंगा परिधान केला होता. या गोष्टीवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. स्वरा भास्करचा रिसेप्सनचा फोटो पाहून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने तिला घाघरा-ए-मुमताज म्हणलं आहे. तर एकाचे स्वराचे ‘पाकिस्तानवर जास्त प्रेम आहे’, अशी कमेंट केली आहे. यासोबतच एका युजरने त्याला टॅग केले आणि लिहिले की ही राष्ट्रीय लाजिरवाणी आहे. एका यूजरने तिला तुकडे-तुकडे गँगचा भाग म्हटले आहे. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करच्या नावावर अशा कमेंट्सचा वर्षाव सातत्याने होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 10:07 IST

संबंधित बातम्या