विशाल भारद्वाज हे चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. सतत काहीतरी नवीन कथा ते लोकांसमोर आणत असतात. केवळ दिग्दर्शनच नव्हे तर संगीत दिग्दर्शनात सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांचे चित्रपट आणि गाणी यांना प्रेक्षक चांगलीच पसंती देतात. आता विशाल भारद्वाज हे असाच एक आगळा वेगळा थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहेत.

‘कुत्ते’ हे या चित्रपटाचं नाव आहे. मध्यंतरी या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित झालं होतं आणि त्यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. या पोस्टरमध्ये कुत्र्यांचं डोकं आणि खालचं शरीर हे माणसांचं असं दिसत होतं. हे वेगळं आणि मजेशीर पोस्टर पाहून प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली होती. आता नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

आणखी वाचा : अरबाज खानच्या मुलाने केला करण जोहरबरोबर कामाचा श्रीगणेशा; आणखी एक स्टारकीड बॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज

दिग्दर्शक लव रंजन यांच्या प्रोडक्शन कंपनीच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. थरार आणि मनोरंजनाने भरपूर असलेल्या ‘कुत्ते’या चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज अशा प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. तसेच, ‘कुत्ते’हा एक केपर-थ्रिलर असून, विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. आसमानचा हा पहिलाच चित्रपट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ या दिवशी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारा लिखित, हा चित्रपट डार्क-कॉमेडी असून, आपल्या पोस्टर लाँचने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. तसेच, चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले आहे, तर गुलजार यांनी यातील गाणी लिहिली आहेत.