अभिनेत्री करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा ‘द क्रू’ (The Crew) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांकडून या टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकताच या चित्रपटातील करीना, क्रिती आणि तब्बू यांचा लूक समोर आला आहे.

‘द क्रू’ या चित्रपटात करीना , क्रिती व तब्बू एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लूकमध्ये या तिघी क्रिती लाल रंगाच्या एअर हॉस्टेसच्या पोषाखात दिसत आहेत. करीनाने सोशल मीडियावर तिघींचा हा लूक शेअर केला आहे. फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले, “चेक-इनसाठी तयार आहात? क्रूसोबत उड्डाण करण्याची वेळ झाली आहे.”

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरच्या बॅकग्राउंडला, ‘चोली के पीचे क्या है’ हे सुपरहिट गाणे ऐकू येत होते. या चित्रपटाचा टीझर शेअर करताना करीनानं कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘तुमचा सीटबेल्ट बांधा, तुमचे पॉपकॉर्न तयार ठेवा.’

हेही वाचा- “कितीही अंधार पडला तरी…”; घटस्फोटाच्या घोषणेनंतर ईशा देओलने शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली…

‘द क्रू’ चित्रपट येत्या २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. राजेश ए कृष्णन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर व एकता कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिर्ती केली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना तीन एअर होस्टेसची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात करीना, क्रिती व तब्बू व्यतरिक्त दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.