दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. खासकरून ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडली आहे. विवेक हे बॉलिवूडबद्दल आणि एकूणच राजकीय परिस्थितीबद्दल परखडपणे आपली मतं सोशल मीडियावर मांडत असतात.

गेले काही दिवस ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील काही डिलीट केलेले सीन्स शेअर करत आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला, या चित्रपटाने तब्बल ३०० कोटीहून अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली. या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मीरचा एक वेगळाच इतिहास समोर आला.

आणखी वाचा : “त्याने माझ्या पार्श्वभागाला…” विनयभंगाच्या ‘त्या’ धक्कादायक अनुभवाबद्दल अक्षय कुमारचा खुलासा

या चित्रपटातील असाच एक डिलिट केलेला नवा सीन विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केला आहे. हा सीन प्रामुख्याने कलम ३७० हटवण्याबद्दल आहे. यात मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि मृणाल कुलकर्णी यांची लाजवाब अदाकारी बघायला मिळत आहे. या सीनच्या माध्यमातून ३७० कलम हटवूनही काश्मीरमध्ये काहीच फरक पडला नसल्याचं दिग्दर्शकाने मांडायचा प्रयत्न केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरवर विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेल्या या सीनची जबरदस्त चर्चा होत आहे. विवेक अग्निहोत्री आता त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. त्यांच्या या चित्रपटात पल्लवी जोशी, नाना पाटेकर, अनुपम खेर, कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अग्निहोत्री यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत.