‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा प्रसिद्धीझोतात आली. अदाला मराठी संस्कृतीविषयी विशेष प्रेम आहे. तिला असंख्य मराठी गाणी आणि कविता तोंडपाठ आहेत. मराठी संस्कृतीबद्दल आवड असल्याने अदा अलीकडेच दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती. यावेळी अभिनेत्रीने खास नऊवारी साडी नेसली होती. तिचा हा मराठमोळा लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा : “वडापाव खायला पैसे नसायचे”, ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातला आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाली, “झगमगत्या दुनियेत…”

नऊवारी साडी, नाकात नथ आणि पायात शूज असा हटके लूक अदाने दहीहंडी उत्सवानिमित्त केला होता. नऊवारी साडीवर शूज घालण्यामागे एक विशेष कारण होतं याबद्दल सांगताना अदा लिहिते, “काष्टा साडी, नथ आणि शूज कसा वाटला माझा लूक? ही माझ्या आजीची साडी आहे. साडी नेसून जवळपास १ किलोमीटर मला चिखलातून चालायला लागणार असल्याने नऊवारी साडीवर मी माझ्या मैत्रिणीचे शूज घातले होते.”

हेही वाचा : “हा माणूस…,” शाहरुखचा ‘जवान’ पाहून भूमी पेडणेकरने दिली प्रतिक्रिया, गिरीजा ओकचा उल्लेख करत म्हणाली…

अदाच्या मराठमोळ्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “मराठी मुलगी”, “अदा की अदा”, “मॅडम, तुम्हाला मराठी संस्कृती खूपच आवडते वाटतं”, “भारतीय संस्कृती या चित्रात दिसून येते” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर केल्या आहेत.

हेही वाचा : एक्सप्रेस अड्डामध्ये करीना कपूर खानशी खास गप्पा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अदाने यापूर्वी ‘द केरला स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरल्यावर मराठीतून पोस्ट शेअर करत सर्व प्रेक्षकांचे आभार मानले होते. तसेच तिने तिच्या मराठी चाहत्यांना विठ्ठलाचा अभंग गात आषाठी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. आता पुन्हा एकदा मराठमोळा लूक करून अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.