कमांडो’, ‘१९२०’ या चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवणारी बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. अभिनयाबरोबरच अदा मिमिक्रीही करते. तसंच ती उत्तम मराठीही बोलते. ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अदाचे मराठी भाषेतील काही कवितांचे व्हिडीओ व्हायरलही झाले होते.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निमित्ताने अदाने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अदाला महाराष्ट्रीयन लोकांबद्दल तुझं काय मत आहे? असा प्रश्न विचारला गेला. अदा म्हणाली, “महाराष्ट्रातील लोक खूप गोड आहेत. मी माझ्या मराठीतल्या कविता शेअर करते. त्यात थोड्या फार चुका असतात. पण मराठी लोक त्यातील चुका काढत नाहीत. व्हिडीओ पाहून ते किती गोड आहे, किती छान आहे, असं म्हणतात. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोन आहे. चुका काढण्यापेक्षा चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याचा गुण संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांकडे आहे.”

हेही वाचा>> “माझा बॉडीगार्ड मुस्लीम आहे”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “त्यांच्या धर्मातील लोक…”

अदा शर्माला “मराठी सिनेसृष्टीत काम करण्याची इच्छा आहे का?” असा प्रश्नही विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना अदाने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. “भारतातील प्रत्येक भाषेत एक तरी चित्रपट तू केला पाहिजे, असं माझे वडील सांगतात. मी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड या भाषांमध्ये काम केलं आहे. आता ‘द केरला स्टोरी’ मल्याळम भाषेतही प्रदर्शित होत आहे. मी पंजाबी गाण्याच्या व्हिडीओमध्ये काम केलं आहे. मला मराठीत काम करायला आवडेल,” असं अदाने सांगितलं.

हेही वाचा>> Video : ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग, प्रशांत दामले म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटात अदा शर्माने शालिनी उन्नीकृष्णन ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही होत आहे. लव्हजिहादच्या जाळ्यात अडकवून दहशतवादी बनवलेल्या मुलींच्या सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.