Tiger 3 box office collection day 9: सलमान खान, कतरिना कैफ व इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘टायगर ३’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत होता. पण आता दुसऱ्या आठवड्यात मात्र याच्या एकूण कमाईत मोठी घट पाहायला मिळत आहे. चित्रपटाची कमाई आता सारखी मंदावत आहे. त्यामुळे चित्रपट देशांतर्गत ३०० कोटींची कमाई करण्याची शक्यता खूपच धुसर झाली आहे.

‘सलमान खान’चा टायगर ३ प्रदर्शित होऊन नऊ दिवस झाले आहेत. दिवाळीच्या दिवशी (१२ नोव्हेंबरला) रिलीज झालेल्या या चित्रपटाने नवव्या दिवशी सर्वात कमी बॉक्स ऑफिस कमाई केली. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’नुसार या चित्रपटाने नवव्या दिवशी भारतातील सर्व भाषांमध्ये केवळ ६.५ कोटी रुपये कमावले आहेत. सुरुवातीचा आठवडा दमदार ओपनिंग करूनही बॉक्स ऑफिसवर या अॅक्शन चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चांगलीच घट झाली आहे.

“आमचे फोटो वधू-वरांसारखे दिसतात”, मन्सूर अली खानचं त्रिशाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला, “मी काही…”

या चित्रपटाचे देशातंर्गत एकूण कलेक्शन २३६ कोटी रुपये आहे. आताची आकडेवारी पाहता चित्रपट २५० कोटींच्या जवळ जाऊ शकतो, पण ३०० कोटींचा टप्पा गाठणं खूप कठीण वाटत आहे. तुलनेने यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील ‘पठाण’ने देशात ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. ‘टायगर ३’चे जगभरातील कमाईचे आकडे पाहिल्यास हा चित्रपट ४०० कोटी कमावण्यात यशस्वी झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या वीकेंडनंतरच चित्रपटाची कमाई मंदावली. त्यामुळे आता या कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि तो २५० कोटींचा गल्ला सहज जमवेल असं दिसतंय, त्यामुळे या चित्रपट यंदाच्या हिट चित्रपटाच्या यादीत समाविष्ट झाला आहे.