अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघेही सध्या चांगलेच चर्चेत आहे. दोघांनी एका गोंडस मुलीला जन्म दिल्यावर प्रेक्षकांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. आलियानेदेखील सोशल मीडिया अकाऊंटवर आई झाल्यानंतरचा पहिला फोटो शेअर केला आहे. दोघेही आता काही काळ अभिनयापासून दूर राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

रणबीरच्या जीम ट्रेनरने मात्र त्याचं कौतुक केलं आहे. रणबीरने मुलगी झाली तरी जीमला येऊन व्यायाम करायचं टाळलं नाही म्हणून ड्रीव नील याने रणबीरचं कौतुक केलं आहे. रणबीरबरोबर जीममधील फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. फोटोमध्ये रणबीरने निळा टि-शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहे आणि तो अत्यंत रीलॅक्स दिसत आहे.

आणखी वाचा : २०० कोटींच्या मनी लाँडरींग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

हा फोटो शेअर करत ड्रीवने लिहिलं, “या माणसाकडे जीमला दांडी मारायचे सर्वात उत्तम कारण आहे, जे म्हणजे त्याला झालेली मुलगी. तरी तो नियमितपणे व्यायामासाठी आला आहे. त्याने आजवर एकही सेशन बुडवलेलं नाही. रणबीर आणि आलिया तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीरच्या चाहत्यांनीही यावर कॉमेंट करत रणबीरच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. ६ नोव्हेंबर रोजी आलियाने त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. तिने याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावूक पोस्ट शेअर करत चाहत्यांना बातमी दिली. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आणि रणबीर प्रेमात पडले. आता आलिया हॉलिवूडपटात झळकणार आहे. रणबीरसुद्धा त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटावर काम करत आहे.