आपल्या अनोख्या कपड्याच्या फॅशनने ओळखली जाणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. कधी डार्क लिपस्टिक तर कधी मोबाईलमधल्या सिम कार्डचा ड्रेस, या अशा जगावेगळ्या गोष्टींमुळे तिला ट्रोलदेखील केलं जात. उर्फी ट्रोलिंगाला सामोरी जात असते. नेटकऱ्यांना ती वेळोवेळी आपल्या भाषेत उत्तर देत असते. तिचा विचित्र कपड्यांवर नेटकरी कॉमेंट्स करत असतात मात्र आता तर तिने चक्क कपडे परिधान करता फोटोशूट केले आहे.
उर्फीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने कोणतेही कपडे परिधान केलेले नाहीत. काचेच्या तुकड्याला कॅमेराच्या आणि तिच्यामध्ये ठेवून हे फोटोशूट केले आहे. तिचा हा विचित्र प्रकार बघून नेटकऱ्यांनी हात जोडले. एकाने लिहले ‘हे परिधान करण्याचीदेखील गरज नाही’ त्यावर दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली ‘मुळात तिने काहीच परिधान केलेले नाही’. एकाने लिहले ‘काहीही असो तू बोल्ड दिसत आहेस’. आणखीन एकाने लिहलं आहे ‘नवी सकाळ नवं नाटक. आठवड्यात एकदा नाटक करणारी ही आता दोनदा करायला लागली आहे. ही बहुतेक हे जगच संपवून टाकणार’.
“माझी भूमिका तुम्हाला… ” आदिपुरुष चित्रपटातील भूमिकेबद्दल क्रिती सेनॉनची स्पष्ट प्रतिक्रिया
नुकताच उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्येही ती नेहमीप्रमाणे तिच्या बोल्ड अवतारात दिसत होती.या व्हिडिओमध्ये ती शाहरुख खानच्या ‘दर्द-ए-डिस्को’ या गाण्यावर थिरकताना दिसली होती. या व्हिडिओमध्ये तिने एक वेगळ्या प्रकारचा मुखवटा चेहऱ्यावर घातला होता यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते.
मध्यंतरी उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिला ब्लॅकमेल करुन त्रास देणाऱ्या व्यक्तीबद्दलची माहिती दिली होती. उर्फी जावेदच्या या पोस्टनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होत.