बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. कंगना समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते. काही आक्षेपार्ह ट्वीटमुळे कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद केलं गेलं होतं. पण काही दिवसांपूर्वीच तिच अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. त्यानंतर कंगनाने ‘पठाण’बाबत एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटवर सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने रिप्लाय दिला आहे.

चित्रपट निर्माती प्रिया गुप्ता यांनी ‘पठाण’ चित्रपटाचा थिएटरमधील एक व्हिडीओ शेअर करत चित्रपटाच्या यशाबाबत ट्वीट केलं होतं. “पठाणच्या यशासाठी शाहरुख खान व दीपिका पदुकोणचं अभिनंदन. हिंदू-मुस्लीम सगळेच शाहरुखवर प्रेम करतात. बॉयकॉट ट्रेण्डमुळे चित्रपटाला नुकसान नाही तर फायदा झाला आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे, हे ‘पठाण’मुळे सिद्ध झालं आहे”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

हेही वाचा>> Video: “चहल भाऊ वहिनी नशेत…”, पार्टीतील ‘त्या’ व्हिडीओमुळे धनश्री वर्मा ट्रोल

कंगना रणौतने या ट्वीटला रिप्लाय दिला होता. “हे खूपच छान विश्लेषण आहे. या देशानं सर्व खान नावाच्या कलाकारांना फक्त आणि फक्त प्रेम दिलंय. प्रसंगी फक्त खान यांनाच प्रेम दिलंय. मुस्लिम अभिनेत्रींना तर डोक्यावर घेतलंय. त्यामुळे भारतावर द्वेष आणि फॅसिजमचा आरोप करणं अन्यायकारक आहे. जगात भारतासारखा दुसरा कुठला देश नाही”, असं कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

हेही वााचा>> Pathaan Box Office Collection: पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच बोलबाला; कमावले ‘इतके’ कोटी

हेही वाचा>> ‘पठाण’च्या यशानंतर ‘पठाण २’ येणार! दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांची मोठी घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाच्या या ट्वीटला उर्फी जावेदने उत्तर दिलं आहे. “ओह माय गॉड! हिंदू कलाकार, मुस्लीम कलाकार…काय विभागणी केली आहे. कला ही कधीच धर्माने विभागली जात नाही. कलाकार फक्त कलाकार असतात”, असं म्हणत उर्फीने कंगनाच्या ट्वीटला रिप्लाय दिला होता. आता यावर कंगना काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.