७० च्या दशकातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आई म्हणजेच तनुजा यांच्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. काही कारणांमुळे प्रकृती खालवल्याने तनुजा यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना अचानक रुग्णालयात दाखल केल्याने बरेच चाहते चिंताग्रस्त झालेले आहेत.

परंतु चिंतेचं काहीच कारण नसल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे. वयोमानामुळे तब्येतील होणारे बदल अन् यामुळे होणाऱ्या त्रासासाठी तनुजा यांना ‘आयसीयु’मध्ये ठेवण्यात आलं असून डॉक्टर त्यांचा इलाज करत आहेत. एका जाणकार व्यक्तीने ‘पीटीआय’ला दिलेल्या वक्तव्यानुसार, “डॉक्टर तनुजा यांच्यावर उपचार करत असून काळजी करण्याचे काही कारण नाही. आणखी काही वेळ त्यांना डॉक्टरांच्या निरक्षणाखाली ठेवण्यात येईल.”

आणखी वाचा : ‘मकबुल’साठी विशाल भारद्वाज यांना सोडावे लागले ३० लाखा रुपयांवर पाणी; दिग्दर्शक म्हणाले, “आजवर मला…”

तनुजा या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. अद्याप काजोल किंवा अजय देवगण यांनी मीडियाशी थेट संवाद साधायचं टाळलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक कुमारसेन समर्थ व अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या कन्या तनुजा यांनी हिंदी तसेच बंगाली चित्रपटात मोलाचं योगदान दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तनुजा यांनी शोमू मुखर्जी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुली आहेत काजोल आणि तनिशा. दोघींनी बॉलिवूडमध्ये आपलं करिअर केलं आहे. आपली मोठी बहीण नूतन हीच्यासह तनुजा यांनी बालकलाकार म्हणून ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ‘हमारी याद आयेगी’, ‘बहारें फिर भी आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’, हाथी मेरे साथी’, ‘मेरे जीवन साथी’अशा सुपरहीट चित्रपटाच्या माध्यमातून तनुजा यांनी आपली छाप प्रेक्षकांवर सोडली.