Sam Bahadur Review: बुधवारी रात्री विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’चे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रीनिंगला अनेक बॉलिवूड कलाकारांनी व सेलिब्रिटीजनि हजेरी लावली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे आणि विकी कौशल पडद्यावर त्यांचे हे पात्र साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक मोठमोठे कलाकार हजर होते.

स्क्रीनिंगला आलेल्या बहुतेक सगळ्यांनाच चित्रपट प्रचंड आवडला असून बरेच सेलिब्रिटीज त्यांच्या पद्धतीने व्यक्त झाले आहेत. ट्रेड एक्स्पर्ट श्रीधर पिल्लई यांनी ट्वीट करत लिहिलं, “सॅम बहादुरच्या खास आयोजित केलेल्या स्क्रीनिंगला स्टँडिंग ओवेशन मिळालं आहे अन् विकी कौशलने सगळ्यांना खाऊन टाकलं आहे यावर सगळ्यांचं एकमत आहे.”

आणखी वाचा : उत्तरकाशी बचाव मोहिमेवर अक्षय कुमार काढणार चित्रपट; सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट

याबरोबरच अभिषेक बच्चन व आशुतोष गोवारीकर यांनीही याबद्दल ट्वीट करत विकी कौशल आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे. अभिषेकने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, “काल रात्री सॅम बहादूर पाहिला. #FieldMarshalSamManekshaw यांनी जे काही केले आणि जे काही साध्य केले ते निव्वळ महान आहे! आणि माझ्या आवडत्या मेघना गुलजारने ही गोष्ट खूप सुंदरपणे सांगितली आहे. भारताच्या एका महान नायकाचे चित्रण करणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि तिने ती लीलया पार पाडली आहे. संपूर्ण कलाकार आणि क्रूबद्दल अभिमान वाटतो. अन् विकी कौशल मी तुझ्याबद्दल काय सांगू… तू आमच्या सर्वांसाठी इतका मोठा बेंचमार्क सेट केलायस त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशुतोष गोवारीकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “मेघना गुलजारचे उत्कृष्ट दिग्दर्शन, अन् विकी कौशलचा कमालीचा अभ्यासपूर्ण अभिनय. तुम्हाला सॅम माणेकशा यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे.” याबरोबरच आशुतोष गोवारीकर यांनी निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचेही अभिनंदन केले आहे. याबरोबरच जावेद अख्तर, सुभाष घई, रेखा, आहाना कुमरा, निमरत कौर, अन् विकीचा भाऊ सनी यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.