scorecardresearch

Premium

Sam Bahadur Trailer: “हमारी वर्दी का गौरव हमेशा…” विकी कौशलच्या बहुचर्चित ‘सॅम बहादुर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

Sam Bahadur Trailer: हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी विकीने घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा करायलाही सुरुवात केली आहे.

sam-bahadur-trailer
फोटो : व्हिडीओतून स्क्रीनशॉट

Sam Bahadur Trailer: विकी कौशल आणि मेघना गुलजार यांचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. टीझर आणि पोस्टरनंतर आता नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे.

ट्रेलरमध्ये विकी कौशलने देहबोली, संवादफेक, फील्ड मार्शलच्या भूमिकेसाठीचा अॅटीट्यूड यावर प्रचंड मेहनत घेतल्याचं जाणवत आहे. सॅम माणेकशा यांच्या हालचालीपासून बोलण्याची लकब अगदी हुबेहूब विकीने पकडली आहे. विकीच्या करिअरमधील ही सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी विकीने घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा करायलाही सुरुवात केली आहे.

audience trolled sana javed by chanting sania mirza name
Video: सानिया मिर्झाचं नाव घेत प्रेक्षकांनी शोएब मलिकच्या तिसऱ्या बायकोला चिडवलं, नेटकरी म्हणाले, “भारत-पाकिस्तान…”
vikrantmassey
“आमच्याकडे प्लॅस्टिकच्या खुर्च्या…”, घरी जेवायला आलेल्या मित्रांनी विक्रांत मेस्सीला दिला आयुष्यातील सर्वात मोठा धडा
razakar-trailer
“ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’

आणखी वाचा : ‘आश्रम’मधील ‘बबिता’ अडकणार लग्नबंधनात; त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा, म्हणाली “पुढील वर्षी…”

या चित्रपटात सॅम माणेकशा यांचा भारतीय सैन्यातील एकूण प्रवास, त्यांची शिस्त, त्यांची देशभक्ती, १९७१ च्या दरम्यान भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांची कामगिरी अशा वेगवेगळ्या पैलूंचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे ते ट्रेलर पाहताना जाणवतं. याबरोबरच चित्रपटात सॅम यांचे खासगी कौटुंबिक आयुष्य, राजकीय नेत्यांशी त्यांचे असलेले मतभेद व त्यामुळे त्यांना झालेला त्रास या सगळ्यावरही चित्रपटात भाष्य केलं असल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे.

या चित्रपटात सॅम माणेकशा यांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य करण्यात आलं असून तत्कालीन राजकीय परिस्थितिचंही अचूक चित्रण यात करण्यात आल्याचं ट्रेलरवरुन दिसत आहे. मेघना गुलजार हिने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विकी कौशलसह या चित्रपटात फातीमा सना शेख ही इंदिरा गांधींच्या भूमिकेत व सान्या मल्होत्रा ही सॅम माणेकशा यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

याबरोबरच नीरज काबी, मोहम्मद झीशान अयुब, आशिष विद्यार्थी यांसारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गेली ७ वर्षं मेघना गुलजार या चित्रपटावर काम करत आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ही प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal starrer sam bahadur trailer out now avn

First published on: 07-11-2023 at 18:34 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×