बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये दिवाळी सणाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. आतापासूनच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींकडून दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त बॉलिवूड निर्माते रमेश तोराणी यांनी आयोजित केलेल्या पार्टीसाठी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीही हजेरी लावली.

विकी कौशल आणि कतरिना कैफ या जोडीचे लाखो चाहते आहेत. अशीच एक चाहती त्यांना या पार्टीतही भेटली. आपल्या या चाहतीसाठी विकी कौशल चक्क फोटोग्राफर बनल्याचं पाहायला मिळालं. ‘मानव मंगलानी’ने या पार्टीतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये चाहती तिचा फोन विकीच्या हातात देऊन कतरिनाबरोबर फोटो काढण्यासाठी पोझ देत आहे. तर नंतर विकी-कतरिनाबरोबर सेल्फी घेण्यासाठीही तिने विकी कौशलच्या हातात फोन दिल्याचं दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा >> रस्त्यावरील छोट्या मुलीला पैसे दिल्यानंतर दुसरा मुलगाही काजोलच्या गाडीमागे धावला अन्…; पाहा व्हिडीओ

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

दिवाळी पार्टीसाठी कतरिनाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान करत खास लूक केला होता. तर विकी निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसून आला. पार्टीतील विकी-कौशलचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा >> Video : हार्दिक-अक्षयाची लगीनघाई! राणादाने विणली पाठक बाईंसाठी लग्नाची साडी, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकी कौशल आणि कतरिना कैफ २०२१च्या डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकले. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. विकी-कतरिनाच्या लग्नाला येत्या डिसेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच दिवाळी असणार आहे. नुकतंच त्यांनी लग्नानंतरची पहिली करवा चौथ साजरी केली.