Bollywood Movies Based On Terror Attacks : बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे सत्य घटनेवर आधारित आहेत. खऱ्या आयुष्यात घडलेल्या दहशतवादी हल्ल्यावर ते आधारित आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत हे चित्रपट आणि त्यामध्ये कोणत्या कलाकारांनी काम केलं आहे.
मुंबई मेरी जान (२००८) – निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुंबई मेरी जान’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, तो २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये मुंबईत झालेल्या रेल्वे स्फोटावर हा चित्रपट आधारित आहे.
द अटॅक ऑफ २६/११ (२००५) – लोकप्रिय दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा दिग्दर्शित ‘द अटॅक ऑफ २६/११’ हा चित्रपट २००८ मध्ये मुंबईत घडलेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरला होता आणि सर्वत्र भीतीपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर, संजीव जैस्वाल, अतुल कुलकर्णी, जितेंद्र जोशी हे कलाकार झळकले होते.
हॉटेल मुंबई (२०१८) – २०१८ मध्ये घडलेल्या मुंबईतील ताज महल पॅलेस येथील सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अभिनेते अनुपम खेर, देव पटेल, मनोज मेहरा यांसारखे अनेक कलाकार पाहायला मिळाले.
Phantom (2015) – कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट २६/११ या भयाण दहशतवादी हल्ल्यानंतरही सुरू राहिलेल्या दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेवर आधारित आहे. त्यामध्ये सैफ अली खान व करीना कपूर मुख्य भूमिकांत आहेत.
बाटला हाऊस २०१९ – निखिल अडवाणी दिग्दर्शित बाटला हाऊस चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट बाटला हाऊस इन्काउंटर यावर आधारित असून, जॉन अब्राहमने यामध्ये एका पोलिसाची भूमिका साकारली आहे.
Uri : The Surgical Strike (2019) – आदित्य धार दिग्दर्शित हा चित्रपट बॉलीवूडमधील दहशतवादी हल्ल्यांवर आधारित असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्यामध्ये लोकप्रिय अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २०१६ मधील सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे. या चित्रपटातील विकीच्या कामासाठी त्याचे अनेकांकडून कौतुक झाले होते.
Baby 2015 – बेबी हा एक थ्रिलर चित्रपट असून, तो सत्य घटनेवर आधारित आहे. ‘बेबी’ हा चित्रपट भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांच्या टीमबद्दल आहे, जी देशाबाहेरील दहशतवादी टोळ्या संपवण्यासाठी काम करते.
