बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. संपूर्ण जगभरात त्यांचे चाहते आहेत. गेली अनेक वर्ष अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून काल रात्री त्यांचे अनेक चाहते त्यांच्या ‘जलसा’ या निवास्स्थानाच्या बाहेर बिग बींना शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. त्यांच्या या प्रेमाचा मान राखत अमिताभ यांना यांनीही चाहत्यांना त्यांची एक झलक दाखवली.

आणखी वाचा : Exclusive video: अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून का दूर होत्या वर्षा उसगांवकर? अभिनेत्रीने केला खुलासा

अमिताभ बच्चन यांच्या प्री बर्थडे नाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे अनेक चाहते त्यांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घराच्या गेटबाहेर जमलेले दिसत आहे. बिग बी घराबाहेर त्यांना भेटायला येणार असल्याची चाहत्यांची कुजबुजही या व्हिडीओत ऐकू येत आहे. इतक्यात ‘जलसा’चे गेट सुरक्षारक्षकाने उघडले आणि अमिताभ बच्चन घराबाहेर येत चाहत्यांमध्ये मिसळून त्यांनी दिलेल्या हसत हसत स्वीकारताना दिसत आहेत.

या व्हिडीओत अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच त्यांची मुलगी श्वेता बच्चनही दिसत आहे. श्वेतानेही तिच्या वडिलांसोबत तिथे उभी राहून उपस्थित चाहत्यांना अभिवादन केले. अमिताभ बच्चन यांना पाहून तिथे उभ्या असलेल्या चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. बिग बींना पाहून चाहते त्यांना हाका मारत होते आणि शिट्ट्याही मारत होते. अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा द्यायला जाताना चाहत्यांनी बर्थडे पार्टीच्या टोप्याही घातल्या होत्या. अमिताभ यांना पाहिल्यावर चाहत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या या नम्रपणाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

हेही वाचा : रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या चाहतीने अमिताभ बच्चन यांच्यासाठी सोडलं होतं अन्न पाणी; नंतर बिग बींनी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. ७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या. आजही काम करतानाची त्यांची ऊर्जा अनेकांना प्रेरणा देते.