२०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वॉर’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर हृतिकने तीन वर्षांचा ब्रेक घेतला. गेल्या महिन्यामध्ये त्याचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पुष्कर आणि गायत्री या दिग्दर्शक जोडीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हृतिकसह सैफ अली खान या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहे.

या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची यशस्वी घोडदौड सध्या सुरु आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी या चित्रपटाने १०.३० कोटी रुपयांची कमाई केली. एका आठवड्यामध्ये या चित्रपटाचे कलेक्शन ५९ कोटी रुपये इतके झाले. शुक्रवारी या चित्रपटाने २.५० कोटी रुपयांचा गल्ला केला. आठव्या दिवशी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ६१ कोटी रुपये जमा झाले. ‘विक्रम वेधा’ने आतापर्यंत भारतामध्ये ७२ कोटी आणि भारताबाहेरील देशांमध्ये ३१ कोटी अशा एकूण १०३ कोटी रुपये कमावले आहेत.

आणखी वाचा – “संस्कृतीची मोडतोड करणं चुकीचं…” ‘आदिपुरुष’ टीझरवर ‘रामायण’ फेम अरुण गोविल यांनी सोडलं मौन

रिमेक असल्यामुळे हा चित्रपट चालेल की नाही अशी भीती निर्मात्यांना होती. कलेक्शनच्या आकडा पाहून त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चित्रपट दुसऱ्या आठवड्यामध्येही चांगली कमाई करणार असा त्यांना विश्वास आहे. प्रदर्शनानंतर आठव्या दिवशी या चित्रपटाने जागतिक स्तरावर १०० कोटींचे कलेक्शन करत नवा विक्रम केला आहे. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा हा हृतिक रोशनचा १३ वा चित्रपट आहे. ‘कभी खुशी कभी गम’ हा त्याच्या कारकीर्दीतला १०० कोटी रुपये कमावणारा पहिला चित्रपट आहे. त्याच्या बहुतांश चित्रपटांनी हा विक्रम केला आहे.

आणखी वाचा – “आता ‘चिकन ६५’ची रेसिपी…”, शाहरुख खानने ‘जवान’ चित्रपटाबद्दल केलेलं ट्वीट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच सुमारास ‘पोन्नियिन सेल्वन १’ (हिंदी), ‘गॉडफादर’ (हिंदी), ‘गुडबाय’ असे काही चित्रपट देखील प्रदर्शित झाले. या चित्रपटांना टक्कर देत ‘विक्रम वेधा’ने बॉक्स ऑफिसवरील अव्वल स्थान टिकवून आहे. हृतिक रोशनने फार मोजक्या, पण दर्जदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.