अभिनेत्री क्रिती सेनॉनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्याबरोबर दिसणाऱ्या तरुणाला ती डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांचाही हा फोटो पाठमोरा आहे, पण या फोटोत दिसणारी क्रिती सेनॉन असून तिच्याबरोबर दिसणारा कबीर बहिया आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिसणारी तरुणी क्रिती असल्याचा दावा केला जातोय. व्हायरल झालेला फोटो लंडनमधील आहे. या फोटोत ती एका तरुणाबरोबर हात हातात घेऊन चालताना दिसत आहे. या फोटोमध्ये दोघांचाही चेहरा दिसत नाहीये, पण क्रितीच्या टीमचे काही लोक त्यांच्या आजूबाजूला होते, त्यामुळे ती क्रितीच आहे, अशी चर्चा आहे.

मराठी बिग बॉस जिंकल्यावर २५ लाखांपैकी निम्मेही पैसे मिळाले नाहीत, शिव ठाकरेचा मोठा खुलासा; म्हणाला, “आई-बाबांच्या तिकिटाचे…”

Saw Kriti Sanon in London holding hands with a guy.
byu/Dripkumar inBollyBlindsNGossip

फोटोमध्ये क्रितीबरोबर दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी अफवा आहे की तो क्रितीचा कथित बॉयफ्रेंड आहे आणि त्याचे नाव कबीर बहिया आहे. कबीर ब्रिटनमध्ये राहतो आणि त्याचे वडील तिथल्या आघाडीच्या व्यावसायिकांपैकी एक आहेत. कबीर बहियाचे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनी यांच्याशीही संबंध आहेत. कबीर साक्षी धोनीचा जवळचा मित्र आहे आणि दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.

क्रिती व कबीर यांच्या वयात सुमारे १० वर्षांचं अंतर आहे. क्रिती व कबीर दोघेही २०२२ च्या अखेरीसपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पण कबीर किंवा क्रितीने आजवर कधीच एकत्र फोटो शेअर केलेले नाहीत किंवा त्यांच्या नात्याबद्दल विधान केलेलं नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये काही तथ्य आहेत की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.