‘द कश्मीर फाईल्स’ काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच विक्रम रचला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे बरेच चर्चेत आले.

आपल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांबरोबरच विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. बॉलिवूडमधील कंपूशाही, नेपोटीजम, आणि स्टार सिस्टमबद्दल विवेक त्यांची परखड मतं मांडत असतात. नुकतंच ‘इंडिया.कॉम’ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये पुन्हा विवेक यांनी करण जोहर आणि शाहरुख खानवर निशाणा साधला आहे. या दोघांनी बॉलिवूडचं प्रचंड नुकसान केल्याचा आरोप विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे.

आणखी वाचा : “आदिपुरुषसारख्या टुकार चित्रपटाला…” OMG 2 ला दिलेल्या ‘ए सर्टिफिकेट’वरुन गोविंद नामदेव यांची CBFC वर टीका

या दोघांबद्दल विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मी करण जोहर आणि शाहरुख खान या दोघांच्या कामाचा, चित्रपटांचा चाहता आहे. पण मला या दोघांचं राजकारण अजिबात आवडत नाही. बॉलिवूडचं सर्वात जास्त नुकसान या दोघांनीच केलं आहे असं मला वाटतं. सध्या चित्रपटसृष्टीत केवळ स्टारडम, पीआर, ग्लॅमर हे सगळं मला पटत नाही. करणही एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे, पण बॉलिवूडमधली त्याची राजकीय नीती मला पटत नाही. बॉलिवूडमध्ये जोवर स्टार पॉवरलाच महत्त्व दिलं जाणार तोवर काहीच बदल घडणार नाही.”

View this post on Instagram

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे शाहरुखबरोबर काम करण्याबद्दल विवेक अग्निहोत्री बोलले, “शाहरुख किंवा अन्य कोणत्याही मोठ्या स्टारबरोबर काम करायला मला काहीच हरकत नाही. पण माझ्या चित्रपटात लेखक आणि दिग्दर्शक हे खरे हीरो असतील अन् ते ह्या बड्या स्टार्सना पटणार नाही.” सध्या विवेक हे त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. नुकतंच स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या या आगामी चित्रपटाची एक छोटीशी झलकही पाहायला मिळाली. या चित्रपटात नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.