बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकनं २००० साली अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ‘रिफ्यूज’ हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर अभिषेकनं बऱ्याच चित्रपटात काम केलं. दिलीप कुमार यांच्यानंतर अभिषेक हा दुसरा अभिनेता आहे, ज्याला अभिनयासाठी सलग तीन वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. अशा हरहुन्नरी अभिनेत्याला एकेदिवशी एका महिलेनं कानशिलात लगावली होती. “वडिलांचं नाव धुळीला मिळवतो आहेस, अभिनय करणं सोडून दे,” असा सल्ला त्या महिलेनं अभिनेत्याला दिला होता.

अभिषेक ‘धूम ३’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होतो. त्यावेळीस एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्यानं हा किस्सा सांगितला होता. यावेळेस त्याच्याबरोबर कतरिना कैफ, आमिर खान व उदय चोप्रा होता. अभिषेकनं सांगितलं की, “एकेदिवशी एक महिला माझ्याजवळ आली. ‘शरारत’ या चित्रपटात मी किती वाईट अभिनय केला हे सांगत तिनं माझ्या थेट कानशिलातच लगावली. त्यानंतर मी अभिनय करणं सोडलं पाहिजे. मी वाईट अभिनय करून आपल्या वडिलांचं नाव धुळीत मिळवतं आहे, असं त्या महिलेनं मला सांगितलं होतं.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – ‘आदिपुरुष’मधील कुंभकर्ण दररोज २० पोळ्या, २५ अंडी व १ किलो खायचा चिकन, कोण आहे ‘हा’ अभिनेता जाणून घ्या

हेही वाचा – “त्याने मला साडीची पिन काढायला सांगितली…..”; हेमा मालिनी यांनी सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

दरम्यान अभिषेकनं ‘रिफ्यूजी’ या चित्रपटानंतर ‘मैं प्रेम की दीवानी हूं’, ‘बंटी और बबली’, ‘गुरु’, ‘सरकार’, ‘युवा’ आणि ‘ब्लफमास्टर’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटात काम केलं. ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्ड अभिषेकनं जिंकला होता.

हेही वाचा – Video: वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच सुम्बुल तौकीर खानचं सावत्र आईविषयी भाष्य; म्हणाली, “आता माझं….”

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकर तो तमिळ थ्रिलर चित्रपट ‘ओथ्था सेरुप्पु साइज ७’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. तसेच अभिषेक रेमो डिसूजा व शूजीत सरकारबरोबरही चित्रपट करणार आहे. शिवाय त्याचा ‘घूमर’ चित्रपटाचेही शूटिंग पूर्ण झाले असून प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

Story img Loader