कुठल्या ही जोडप्याला जेव्हा त्यांचे पहिले अपत्य जन्म घेते तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सध्या बॉलिवूडमधील चर्चेतलं जोडपं म्हणजे आलिया भट, रणबीर कपूर, काल ते गोंडस मुलीचे आई-बाबा झाले. आलिया भट्टच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाच्या सासूबाई नीतू कपूरही नातीच्या जन्मानंतर खूप खूश असल्याचं दिसतंय. रणबीरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याचा एका जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी, रणबीर ‘रविवार विथ स्टार परिवार’ या कार्यक्रमात दिसला होता ज्यामध्ये त्याने अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीकडून पालकत्वाच्या टिप्स घेतल्या होत्या. या भागादरम्यान रणबीरने सांगितले होते की ‘त्याला मुलगी व्हावी.’ अशी इच्छा व्यक्त केली होती. आज तो एका मुलीचा बाबा आहे. इतकंच नाही, तर त्याने रुपालीबरोबर प्रॉप डॉल घेऊन काही डायपर बदलण्याचे प्रशिक्षणही घेतले आणि बाळांना कसे खायला द्यावे हे देखील शिकले.

बॉलिवूड इंडस्ट्री संपली का? रकुल प्रीत म्हणाली, “लोकांना आता…”

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी १४ एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले आणि आलियाने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नन्सीची एक पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या पोस्टला अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आलिया भट्टच्या बाळासाठी कपूर कुटुंबियाप्रमाणेच तिचे चाहतेही उत्सुक होते. गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात आलिया प्रसूतीसाठी दाखल झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘जी ले जरा’मुळेही चर्चेत आहे. तसेच आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ आणि’ शमशेरा’ या चित्रपटात झळकला होता.