बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा ‘पठाण’पासून पुन्हा चर्चेत आला आहे. रोमान्स किंग हे बिरुद मिरवणारा शाहरुख खऱ्या आयुष्यातसुद्धा तितकाच रोमॅंटिक आहे हे त्याच्या आणि गौरी खानच्या लव्हस्टोरीकडे बघून आपल्याला जाणवतं. बॉलिवूडमध्ये या दोघांकडे एक आदर्श जोडपं म्हणून बघितलं जातं. शाहरुखकडे फेम, ग्लॅमर काही नसताना गौरीने त्याची साथ दिली आणि तब्बल ३० वर्षं तिने ती साथ निभावली. शाहरुखनेही तिला कसलीच कमतरता भासू दिली नाही.

परंतु गौरीचे आई वडील आणि घरची इतर वडीलधारी मंडळी प्रथम या लग्नाच्या विरोधात होते. २००८ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गौरीने याबद्दल खुलासाही केला होता. या दोघांचं लग्न झालं तेव्हा शाहरुख केवळ २६ वर्षांचा होता अन् गौरी ही फक्त २१ वर्षांची होती.

raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

आणखी वाचा : Ghar Banduk Biryani Review : गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय; ‘घर बंदूक बिरयानी’ कसा आहे? जाणून घ्या

गौरी मुलाखतीमध्ये म्हणाली, “आम्ही त्यावेळी लग्नासारखा मोठा निर्णय घेण्यासाठी लहान होतो, आणि चित्रपटक्षेत्रात जाणाऱ्या एका दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी मी लग्न करणार होते. त्यावेळी आम्ही शाहरुखचं नाव बदलून अभिनव ठेवलं होतं जेणेकरून तो हिंदू असल्याचं समाधान आम्हाला मिळेल, पण ते खूप मूर्खपणाचं आणि बालिश वागणं होतं याची मला जाणीव नंतर झाली.”

आणखी वाचा : बजरंग बलीपुढे ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शक ओम राऊत नतमस्तक; या मंदिरात जाऊन घेतलं दर्शन

शाहरुख आणि गौरी यांची तीनही मुलं हे दोन्ही धर्मांचं पालन करतात हेदेखील तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. ती म्हणाली, “दिवाळीच्या दिवशी घरातील पूजा मी करते आणि इतर सगळे त्याप्रमाणे मला फॉलो करतात, ईदच्या दिवशी शाहरुख सगळी प्रार्थना करतो आणि आम्ही सगळे त्याचं अनुकरण करतो. आमच्या मुलांनी ही गोष्ट अगदी सहज स्वीकारली आहे, उलट याबाबतीत त्यांचा ओढा शाहरुखकडे जास्त असतो, तो जे सांगेल तसं ते करतात. त्यांना दिवाळी ईद दोन्हीचं खूप कौतुक आहे.”