दिवंगत अभिनेते ऋषी कपूर हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी आयुष्यातील अनेक वैयक्तिक अनुभव स्वतःच्या आत्मचरित्रात मांडले आहेत. त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेन्सर्ड’ या आत्मचरित्रात त्यांनी वडील, अभिनेते राज कपूर यांच्याबरोबर असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे.

ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्पष्टपणे नमूद केलं की, त्यांचे वडील सतत कामात व्यस्त असायचे, त्यामुळे ते घरात क्वचितच असायचे. “मी लहान असताना वडील घरात आले की ते क्षण माझ्यासाठी फार आनंददायी नसायचे,” असं ऋषी कपूर यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे. ऋषी कपूर यांनी पुढे लिहिलं आहे की, “माझे वडील रात्री उशिरा घरी यायचे. ते घरी येताना मद्यधूंद अवस्थेत असायचे. हे क्षण लहानपणी माझ्या मनात खोलवर रुजले.”

हेही वाचा…Video : छोट्या चाहत्यासाठी रस्त्यात थांबला सोनू निगम, टॅलेंटचं कौतुक केलं अन्…; त्याच्या ‘या’ कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

या प्रसंगांनी ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यावर दीर्घकालीन परिणाम केला होता. “माझे वडील रात्री मद्यधूंद अवस्थेत घरी आल्यावर मी माझ्या चादरीखाली लपून बसायचो, त्यांचे शब्द ऐकायचो आणि त्यांच्या आवाजावर लक्ष ठेवायचो. ते घरी आल्यावर त्यांच्या खोलीमध्ये जाताना त्यांचा आवाज हळू हळू कमी झाल्यानंतर मी ते त्यांच्या खोलीत गेले आहेत असं समजायचो. ते खोलीत गेल्यावरच मला दिलासा मिळायचा,” असं ऋषी कपूर यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे.

या प्रसंगामुळे ऋषी कपूर यांच्या मनात वडिलांबाबत भीतीची भावना निर्माण झाली होती. “दररोज मी विचार करत असायचो की, आज रात्री वडील कोणत्या मनस्थितीत येतील? मद्यधूंद अवस्थेत ते माझ्या आईशी वाद घालतील का? वडिलांच्या अशा वागणुकीमुळे मी लहानपणीच ठरवलं की, मी कधीच मद्यपान करणार नाही आणि माझ्या मुलांना घाबरवणार नाही,” असं ऋषी कपूर यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

हेही वाचा…अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज कपूर यांना रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर आणि रीमा जैन व रितू नंदा अशी पाच मुलं होती.