सांगलीची मराठमोळी लोकप्रिय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना गायक पलाश मुच्छल याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी केक कापून सेलिब्रेशन केलं. त्यांच्या या सेलिब्रेशनचे फोटो चर्चेत आहेत. पलाशने स्मृतीबरोबरचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले व कॅप्शनमध्ये पाच लिहिलं.

एका फोटोत स्मृती पलाशसोबत केक कापताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत ती पलाशसह पोज देताना दिसत आहे. पलाश मुच्छाल आणि स्मृती मानधना यांच्या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. पलाशची बहीण गायिका पलक मुच्छालने ‘माय क्युटीज’ असं लिहिलं. तर अभिनेता पार्थ समथानने रेड हार्ट इमोजी कमेंट केली. अभिनेत्री रुबिना दिलैकनेही या पोस्टवर कमेंट केली आहे. दरम्यान पलाश व स्मृतीचे हे फोटो व्हायरल झाल्यावर लोकांना प्रश्न पडू लागले की प्रसिद्ध क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा बॉयफ्रेंड कोण आहे आणि तो काय करतो?

“आम्ही कोणाच्या पोटी जन्मलो?” सरोगसीद्वारे जन्मलेली जुळी मुलं विचारतात प्रश्न; करण जोहर म्हणाला, “ही परिस्थिती…”

कोण आहे पलाश मुच्छल?

पलाश मुच्छल हा गायक, भारतीय संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहेत. पलाशने बॉलिवूडमध्ये अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. पलाश मुच्छल हा बॉलीवूडमधील आघाडीची गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. पलकने सलमान खान आणि हृतिक रोशनसारख्या बड्या स्टार्सच्या चित्रपटात गाणी गायली आहेत. किनारा, आखरी बार, चले आओ, हिरो, लडकी तू कमाल की, सितारों मे, तु ही है आशिकी, नचले तू, मुसाफिर, परछाई, जीना सिखा दे, सरगोशी, सारे जहां से अच्छा ही त्याची काही लोकप्रिय गाणी आहेत.

गरोदर असल्याने सोनाक्षी सिन्हाने केलं लग्न? अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली, “आता बदल एवढाच…”

पलाश व स्मृतीच्या वयातील अंतर

२२ मे १९९५ रोजी जन्मलेला पलाश २९ वर्षांचा आहे. तर १८ जुलै १९९६ रोजी जन्मलेली स्मृती पलाशपेक्षा वर्षभराने लहान आहे. काही दिवसांनी स्मृती २८ वर्षांची होईल.

पलाश मुच्छलची नेटवर्थ किती?

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पलाश मुच्छलची एकूण संपत्ती २० कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचा अंदाज आहे.

सेलिब्रिटी जोडप्याने मुंबईत घेतलं घर, आलिशान अपार्टमेंटसाठी मोजले १९ कोटी रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मृती मानधनाची नेटवर्थ किती?

स्मती मानधना ही महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू आहे, तिला आरसीबीने लिलावात तीन कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतलं होतं. स्मृती मानधनाची एकूण संपत्ती ३३ कोटी आहे. पलाश मुच्छलपेक्षा ती जास्त श्रीमंत आहे.