Bigg Boss 19 Second Wild Card Entry Malti Chahar: ‘बिग बॉस १९’ मध्ये दोन टीम्स झाल्या आहेत. दोन्ही टीममधील स्पर्धकांचे एकमेकांशी चांगलेच वाद होताना दिसत आहेत. या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’ ला सलमानने काही स्पर्धकांना सुनावलं. त्याचबरोबर अनेक पाहुणे या शोमध्ये आले आणि त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या आठवड्यात ‘बिग बॉस १९’ मध्ये एक खास गोष्ट घडली. ‘बिग बॉस १९’ मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. तसेच या आठवड्यात कोण एलिमिनेट झालं? ते जाणून घेऊयात.

क्रिकेटपटू दीपक चहर या आठवड्यात बिग बॉस १९ मध्ये पाहुणा म्हणून आला होता. शो दरम्यान तो सलमान खानबरोबर स्टेजवर क्रिकेटही खेळला. दीपक चहर एका खास कारणाने शोमध्ये आला होता. त्याची बहीण मालती चहर ही दुसरी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉसमध्ये सामील झाली आहे. मालतीने एका जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करून शोमध्ये एंट्री घेतली.

कोण आहे मालती चहर?

Who is Malti Chahar: मालती चहर ही ३४ वर्षांची आहे. ती क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आहे. मालतीला आयएएस अधिकारी व्हायचं होतं, पण नंतर ती ग्लॅमर जगतात आली. ती फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट होती. मॉडेलिंग आणि अभिनयात प्रसिद्धी मिळवल्यानंतर, तिने अनिल शर्मा दिग्दर्शित ‘जीनियस’ या चित्रपटात रॉ एजंटची भूमिका केली होती.

शोमधून कोण झालं एलिमिनेट?

या आठवड्यात, बिग बॉस १९ मध्ये अशनूर कौर, कुनिका सदानंद, नीलम गिरी आणि झीशान कादरी नॉमिनेट झाले होते. होस्ट सलमान खानने इतर स्पर्धकांना सुरक्षित असल्याचं सांगितलं आणि नीलम गिरीला घराबाहेर यायला सांगितलं. त्यानंतर ती खूप रडू लागली. नंतर त्याने नीलमलाही ती एलिमिनेट होणार नसल्याचं सांगितलं. मग सलमान खानने घोषणा केली की या आठवड्यात कोणतेही एलिमिनेशन होणार नाही.

बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादव देखील वीकेंड का वार मध्ये पाहुणा म्हणून आला होता. त्याने घरात जाऊन सर्व घरातील सदस्यांना ‘अँटीडॉट’ टास्क खेळायला सांगितलं. त्यानंतर, घरातील सदस्यांनी वाइल्ड कार्ड स्पर्धक मालती चहरचे स्वागत केले. यावेळी तान्या मित्तलने नीलम गिरीला सांगितलं की तिला मालती आवडत नाही. दुसरीकडे तान्याची लोकप्रियता पाहता मालती तिला टक्कर देण्यासाठी आली आहे, असं नीलम तिला म्हणाली.