“इक बार तो यूँ होगा..थोडासां सुकून होगा
न दिलमें कसक होगी न सरपे जुनून होगा..”

या ‘सात खून माफ’ सिनेमातल्या ओळी इरफानने म्हणाव्यात आणि आपण ऐकत रहावं. बरं त्याची खासियत म्हणजे फक्त याच ओळी ऐकत रहाव्याश्या वाटतात असं नाही त्याचा दीर्घ संवाद असो, स्वगत असो सगळंच विलोभनीय. मंत्रमुग्ध करुन टाकेल असा आवाज अगदी सहज सुंदर अभिनय आणि काळजाला हात घालण्याची त्याची लकब यासाठी तो प्रसिद्ध होता. होता? होता म्हणणं चुकीचं ठरेल कारण तो आजही आपल्या मनात आहेच. पडद्यावर दिसतो आहेच. ‘सलाम बॉम्बे’पासून त्याने केलेली सुरुवात, त्याच्या सीरियल्स, त्याचे चित्रपट सगळंच एखाद्या अवलिया अभिनेत्याला शोभेल असंच. मग तो ‘पानसिंग तोमर’चा रोल असो, ‘लाइफ इन मेट्रो’तला माँटी असो किंवा आपल्या मनाला थेट भिडणारा त्याचा ‘हैदर’मधला रूहदार असो.. किंवा मियाँ मकबूल असो.. सगळीच पात्रं एकाहून एक सरस आणि उत्तम आहेत यात काहीही शंका नाही.

Sonu Sood WhatsApp retrieved after blocked for 61 hours shared posts on social media
अखेर ६१ तासांनी सुरू झालं सोनू सूदचं व्हॉट्सॲप, आले तब्बल ९ हजारांहून अधिक मेसेज; अभिनेता म्हणाला…
bollywood actor ranbir kapoor furious at paparazzi for abusing word video viral
Video: पापाराझीचं ‘ते’ कृत्य पाहून भडकला रणबीर कपूर, व्हिडीओ पाहून नेटकरी देखील संतापले, म्हणाले, “यांच्यासाठी कठोर…”
sahil khan arrested in mahadev betting app case
महादेव बेटिंग ॲपप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून अटक
madhuri dixit and karisma kapoor dances on chak dhoom dhoom song
Video : माधुरी दीक्षित अन् करिश्मा कपूरचा ‘चाक धूम धूम’ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांना आठवला शाहरुख खान, म्हणाले…

मनाला चटका लावून तो गेला.. पण तो मनांत आहेच

आज याच आपल्या लाडक्या इरफानचा वाढदिवस. माणूस गेला की त्याची जयंती साजरी होते… एखादा आजार, एखादं दुःख व्याधी बनतं ते मग मृत्यूपर्यंत साथ देतं. त्याचीही अवस्था अशीच झाली. तो गेला.. मनाला चटका लावून गेला. पण त्याचा वाढदिवस आहे आणि त्याची आठवण आली नाही असं होऊच शकत नाही. ‘चाणक्य’, ‘भारत एक खोज’, ‘बनेगी अपनी बात’, ‘स्पर्श’ ‘चंद्रकांता’ या सीरियल्समध्ये तो झळकला. ‘सलाम बॉम्बे’ मिळाला आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

Irfan Khan Birth Day
इरफान खान जयंती विशेष

इरफान मिथुनची नक्कल का करत होता?

‘मै जिंदगींमे सिर्फ पैसें के लिये काम नहीं करुंगा’ असं इरफानला वाटायचं. त्याने काही चित्रपट पाहिले आणि त्यानंतर त्याने या क्षेत्रात यायचं ठरवलं. अर्थात इरफानला सिनेमात येण्यापासून त्याच्या घरातल्यांनी रोखलंही होतं. कारण त्यांना वाटायचं सिनेमात काम करणं हे हलक्या प्रतिचं आहे. मात्र इरफानने आईला वचन दिलं की मी या क्षेत्रात गेलो तरीही वेगळं काहीतरी नक्की करुन दाखवेन. तरुण वयात इरफानला मित्रांनी सांगितलं होतं की तुझा चेहरा मिथुन चक्रवर्तीसारखा आहे. त्यामुळे इरफान मिथुनची नक्कलही करत असे. तशी हेअरस्टाईलही करण्याचा प्रयत्न केला होता. मिथुन मला आजही आवडतात असं इरफानने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

पठाणाच्या घरी जन्मलेला ब्राह्मण असं इरफानला म्हटलं जायचं?

इरफानने एका मुलाखतीत हा किस्साही सांगितला होता की त्याला पठाणच्या घरी जन्मलेला ब्राह्मण म्हणायचे. कारण त्याने लहानपणापासूनच नॉन व्हेज खाण्यास नकार दिला. तसंच इरफानने हेदेखील सांगितलं होतं की वडिलांना शिकारीचा छंद होता, त्यांच्याबरोबर शिकार करायला जायचोही. पण प्राणी मारला गेला की वाईट वाटायचं. जो प्राणी मारला गेला आहे त्याच्या आईला, भावांना, वडिलांना काय वाटत असेल यावर इरफान आणि त्याचे मित्र, भावंडं हे गोष्टी रचत असत.

इरफान लाऊड थिंकर

मी लाऊड थिंकर आहे. मी बसमध्ये, बाजारात गेलो की संवाद म्हणायचो. त्यावेळी माझ्या पत्नीला वाटायचं की मी घरी हे संवाद म्हणावेत कारण तिला फारच अवघडल्यासारखं व्हायचं असा किस्साही इरफानने सांगितला होता. एक काळ असाही होता की इरफानला सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला होता. आपण जे काम करतो ते काम वाटलं नाही पाहिजे. त्यात आत्मा जिवंत रहायला हवा असं त्याला वाटत असे. त्यामुळे त्याने हेदेखील ठरवलं होतं की आता पुरे झालं आपण मुंबई सोडून द्यावी. त्यावेळी दिग्दर्शक तिग्मांशू धुलियाने त्याला थांबवलं आणि पुढे इतिहास घडला.

परंपरा तोडणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार

परंपरा तोडणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं त्याला कायमच वाटत आलं. त्याने एका मुलाखतीत हा उल्लेख केला होता. सिनेमात काम करताना ज्या परंपरा म्हणून पाळल्या पाहिजेत त्याला काही अर्थ नाही त्यामुळेच त्या आपण मोडल्या आणि त्यात यशही मिळालं असंही इरफान म्हणाला होता. तसंच सिनेमा हे सरस्वती आणि लक्ष्मी यांचं अद्भूत मिश्रण आहे असंही मत त्याने म्हटलं होतं. तसंच सिनेमा ही अशी कला आहे ज्यात मी तुम्हाला असा अनुभव अभिनयातून देऊ शकतो जो तुम्ही दहा वर्षे तरी कमीत कमी लक्षात ठेवाल.

सात खूनमधला रोल करायचा नव्हता

विशाल भारतद्वाजसह मला काम करायचं होतं. त्यामुळे मी ‘सात खून माफ’ मधली भूमिका स्वीकारली. पण मला ती आवडली नव्हती. विशाल भारद्वाज यांनी मला बोलवलं आणि सांगितलं तुला पत्नीला मारणारा शायर उभा करायचा आहे. त्यावेळी मी जरा नाखुशीनेच ती भूमिका केली. सिनेमा मी केला, त्यावर कामही केलं. मात्र सिनेमा एडिट झाल्यानंतर जे समोर आलं त्यात माझ्या पात्राची भीती लोकांना वाटली. खरंतर ते पात्र तसं नव्हतं. असा किस्सा इरफानने सांगितला होता.

धर्माविषयी इरफानचं एकदम परखड मत होतं. धर्म ही तुमची खासगी गोष्ट आहे. तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचा आणि तुमच्यातला तो संवाद किंवा नातं आहे. पण आपल्या देशातच काय किंवा इतर देशांमध्ये काय तो कॉलम आपल्याला का भरावा लागतो? असं परखड मत त्याने व्यक्त केलं होतं. साहेबजादे इरफान खान असं त्याचं पूर्ण नाव होतं. त्यातला आगापिछा उडवून त्याने फक्त इरफान इतकंच नाव धारण केलं. त्यावर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर तो हसत म्हणाला होता की एक वेळ अशीही येणार आहे की हे छोटं केलेलं इरफान हे नावही मी लावणार नाही.

Irfan Khan
इरफान खान जयंती विशेष

शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान या तीन खानांची चलती असताना इरफानने हटके आणि खास भूमिका करत स्वतःला सिद्ध केलं. मकबूलमधली त्याची भूमिका विशेष करुन गाजली. त्याला त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ‘मकबूल’, ‘रोग’, ‘हैदर’, ‘लाइफ इन मेट्रो’, ‘हिंदी मीडियम’, ‘स्टॅनली का डिब्बा’, ‘पिकू’, ‘लाइफ ऑफ पाय’, ‘बिल्लू’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘नेमसेक’, ‘करीब करीब सिंगल’, ‘कारवाँ’ या चित्रपटांमधल्या भूमिकाही विशेष गाजल्या. एक काळ असा होता ज्यात अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी यांनी जसं वेगळ्या भूमिकांसाठी ओळखले गेले त्यांचाच वारसा इरफानने पुढे नेला. त्याची संवाद म्हणण्याची स्टाईल ही समोरच्याला खिशात टाकणारीच असते. मेट्रो सिनेमात जेव्हा इरफान कोंकणाला टेरेसवर घेऊन जातो, त्यावेळी जेव्हा ते दोघे ओरडतात तो सीन आठवला की आजही अंगावर काटा येतो. छोट्या छोट्या प्रसंगातून छाप सोडून जाणं हे इरफानला खूप लीलया जमलं. त्यामुळेच तो चाकोरीबाहेरचा वाटला. तसंच त्याचा तलवारमधला अश्विनी कुमारही भाव खाऊन जातो. आरूषी खून प्रकरणावर हा सिनेमा बेतला होता. अश्विनी कुमार यांची कशी अडचण झाली होती ते त्याने खूप उत्तमरित्या मांडलं होतं.

‘हैदर’ सिनेमा हा शेक्सपिअरच्या हॅम्लेटवर आधारित होता. हॅम्लेटचा धागा घेऊन विशाल भारतद्वाजने या सिनेमाची कथा गोवली होती. या सिनेमात तब्बू, के. के. मेनन, शाहिद कपूर, नरेंद्र झा आणि इरफान यांच्या भूमिका होत्या. शाहिद कपूरचा अभिनय उत्तम झाला आहे. पण नेहमी प्रमाणे लक्षात राहतो तो रुहदार अर्थात इरफान. रुहदार जेव्हा हैदरला भेटतो आणि त्याच्या हरवलेल्या वडिलांबद्दल सांगतो तेव्हांचा प्रसंग असेल किंवा इतर प्रसंग ज्यात रुहदार आहे ते वेगळे ठरतात. एका पायाने थोडासा लंगडत चालणारा, डोळ्यांवर गॉगल, डोक्यावर काश्मिरी टोपी, अंगावर ओढलेली शाल या लुकमध्ये इरफान जो काही वावरला आहे, त्यात कुठेही तो इरफान वाटत नाही. टॉप टू बॉटम रुहदारच वाटतो. “आप मरनेवाले हैं डॉक्टरसाहाब मै नहीं मरनेवाला, वो कैसे जनाब? ऐसे के आप जिस्म हैं मै रुह. आप फानी, मै लाफानी. रुहदार तुम शिया हो या सुन्नी? दरिया भी मैं, दरख्त भी मैं, झेलम भी मैं, चिनारभी मैं, शियाभी हूँ, सुन्नी भी हूँ, मै हूँ पंडित, मै था, मै हूँ और मैही रहुंगा” हा त्याचा हैदर मधला डायलॉग त्यानेच म्हणावा आणि आपण ऐकत रहावं. तो त्याच्या शैलीत जसा वावरला तसाच तो लोकांना आवडला. त्यामुळे इरफान हा सिनेसृष्टीतला कलंदर होता हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.