Zee Cine Awards 2025 Winners List : ‘झी सिने अवॉर्ड्स’ सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. मुंबईत पार पडलेलल्या या कार्यक्रमात कार्तिक आर्यन, जॅकलीन फर्नांडिस, रश्मिका मंदाना, विक्रांत मॅसी, तमन्ना भाटिया, नितांशी गोयल, क्रिती सेनॉन, अनन्या पांडे, राशा थडानी, विवेक ओबेरॉय यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

यंदा या पुरस्कार सोहळ्यात ‘स्त्री २’, ‘भुल भुलैय्या ३’, ‘मुंज्या’, ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटांमध्ये चुरस रंगली होती. अखेर श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ने सर्वाधिक पुरस्कार जिंकत सर्व प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे.

‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये कार्तिक आर्यन-अनन्या पांडे, राशा थडानी, तमन्ना भाटिया, रश्मिका यांचे जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाले. याशिवाय अनन्याने तिचे वडील चंकी पांडे यांच्याबरोबर रंगमंचावर भन्नाट डान्स केला. या सोहळ्यातील बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये कोणत्या सेलिब्रिटींनी बाजी मारली, कोणता सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला, जाणून घेऊयात…

‘झी सिने अवॉर्ड्स’ २०२५ चे विजेते…

  • सर्वोत्कृष्ट VFX : मुंज्या
  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : अमर सिंह चमकीला
  • एक्सपर्ट Costume डिझाईन : दर्शन झालन – लापता लेडीज
  • सर्वोत्कृष्ट ॲक्शनपट : परवेझ शेख – किल
  • सर्वोत्कृष्ट एडिटिंग : आरती बजाज- अमर सिंह चमकीला
  • सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर : संदीप शिरोडकर – भुल भुलैय्या ३
  • सर्वोत्कृष्ट संवाद : आदित्य धर, आदित्य सुहास जांभळे, मोनल ठक्कर – आर्टिकल ३७०
  • सर्वोत्कृष्ट गीत : अमर सिंह चमकिला- इर्शाद कामिल (मैनू विदा करो)
  • सर्वोत्कृष्ट संगीत : ‘स्त्री २’ सचिन-जिगर
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मधुबंती बागची – आज की रात (स्त्री २)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजित सिंह (सजनी) (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (Female) : प्रतिभा रांता आणि नितांशी गोयल – लापता लेडीज
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (Male) : मुंज्या – अभय वर्मा आणि किल – लक्ष्य
  • सर्वोत्कृष्ट खलनायक – जयदीप अहलावत – महाराज
  • सर्वोत्कृष्ट कॉमिक भूमिका – क्रिती सेनॉन – तेरी बातों में ऐसा उल्झा जिया
  • सर्वोत्कृष्ट कॉमिक भूमिका ( Male ) – स्त्री २ अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : रवी किशन – लापता लेडीज
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : माधुरी दीक्षित – भुल भुलैय्या ३
  • Zee5 सर्वोत्कृष्ट अभिनेता : विक्रांत मॅसी, सेक्टर 36
  • Zee 5 आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय अ यंग टॅलेंट – शर्वरी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – विक्रांत मॅसी ( सेक्टर 36 ) आणि कार्तिक आर्यन ( चंदू चॅम्पियन )
  • प्रेक्षक पसंती सर्वोत्कृष्ट गाणं – स्त्री २ – आज की रात
  • प्रेक्षक पसंती सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – स्त्री २ अमर कौशिक आणि किरण राव, लापता लेडीज
  • प्रेक्षक पसंती सर्वोत्कृष्ट चित्रपट – स्त्री २
  • प्रेक्षक पसंती सर्वोत्कृष्ट अभिनेता – कार्तिक आर्यन, भुल भुलैय्या ३
  • प्रेक्षक पसंती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रद्धा कपूर, स्त्री २

दरम्यान, श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ झी सिने अवॉर्ड्समध्ये एकूण ७ पुरस्कार पटकावले आहेत. याशिवाय हा सिनेमाचा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वातून सध्या ‘स्त्री २’च्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.