बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा चित्रपट ‘धाकड’ येत्या शुक्रवारी २० मे ला प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना रणौत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे. ट्विटरवर दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे चाहते कंगना आणि तिच्या चित्रपटाच्या विरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर या प्रकरणात आता अभिनेता सलमान खानचंही नाव घेतलं जात आहे.

सोशल मीडियावर कंगनाच्या चित्रपटाविरोधात #BoycottDhaakad ट्रेंड होताना दिसत आहे. पण या वाद सुरू झालाय तो मागच्या काही दिवसांपासून सलमान खान आणि कंगना रणौत यांच्यात वाढत असलेल्या मैत्रीमुळे. कंगनानं अनेक मुलाखतींमध्ये बोलताना ‘चित्रपट चालवण्यासाठी कोणताही खान माझ्या चित्रपटात असण्याची गरज नाही.’ असं म्हटलं आहे. पण काही दिवसांपूर्वीच कंगना रणौत सलमान खानच्या ईद पार्टीमध्ये दिसली होती. एवढंच नाही तर सलमाननं कंगनाच्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

सलमान खाननं कंगना रणौतच्या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केल्यानंतर कंगनानं त्याला ‘गोल्डन हार्ट’ असलेला दबंग हिरो म्हटलं होतं. हे पाहिल्यावर सुशांतच्या चाहत्याचा राग अनावर झाला असून त्यांनी कंगनाच्या विरोधात #BoycottDhaakad वापरत ट्विटरवर तिला ट्रोल केलं आहे. दरम्यान २०२० मध्ये जेव्हा सुशांतचं निधन झालं होतं त्यावेळी कंगनानं नेहमीच सुशांतला न्याय मिळावा यासाठी भांडताना दिसली होती. मात्र आता सलमान आणि तिची मैत्री सुशांतच्या चाहत्यांना आवडलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर कंगना रणौत लवकरच ‘धाकड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती ‘एजंट अग्नी’ ही भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २० मे दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.