ऐतिहासिक चित्रपटांबरोबरच मराठीमध्ये ‘टाईमपास ३’ सारखे बहुचर्चित चित्रपट देखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. अशातच आता आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तो चित्रपट म्हणजे ‘बॉईज ३’. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. चित्रपटाच्या दोन्ही भागांना बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा मराठीमधील हे बॉईज दंगा करायला तयार झाले आहेत. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे.

आणखी वाचा – “शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी…” हेमांगी कवीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा

Mumbai Court refuses to stay release of Maidaan
अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
randeep-hooda-savarkar3
“मी माझं घर विकून…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य
Marathi Film, Terav, show cancelled, Multiplex theatre , Single Screen, Success, narendra jichkar, Producer Alleges Bias,
मल्टीप्लेक्सचे धोरण मराठी विरोधी, नरेंद्र जिचकार यांचा आरोप

‘बॉईज’ चित्रपटामधील धैर्य, ढुंग्या आणि कबीर या पात्रांनी प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता ‘बॉईज २’ प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता पुन्हा एकदा ‘बॉईज ३’च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.

चित्रपटाच्या या टीझरमध्ये धैर्य, ढुंग्या आणि कबीर हे तीन पात्र दिसत आहेत. दाक्षिणात्य पेहरावामध्ये हे तिन्ही पात्र दिसताहेत. दुसरीकडे त्यांचा या टीझरमधील स्वॅग कमालीचा आहे. तर एक नव्या मुलीची एण्ट्री यामध्ये पाहायला मिळते. पण ही अभिनेत्री कोण? तसेच तिचा चेहरा या टीझरमध्ये दाखवण्यात आलेला नाही. धैर्य, ढुंग्या आणि कबीर म्हणजेच प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे या कलाकारांचं त्रिकुटच ‘बॉईज ३’मध्ये पाहायला मिळेल.

आणखी वाचा – ‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “राजकीय घडामोडी सुरु असताना…”

या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केलं आहे. तसेच चित्रपटामध्ये आणखी कोणते कलाकार काम करताना दिसणार हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल. १६ सप्टेंबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. तरुणाईला वेड लावणाऱ्या या चित्रपटात नवीन काय पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.