scorecardresearch

दीपिका पदुकोण ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसणार का? अयान मुखर्जीने केला मोठा खुलासा

‘ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनानंतर दीपिका पदुकोणच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

दीपिका पदुकोण ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसणार का? अयान मुखर्जीने केला मोठा खुलासा
'ब्रह्मास्त्र'च्या पुढच्या भागात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणार याची सोशल मीडियावर चर्चा होती.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शना आधी आणि नंतरही सातत्याने चर्चेत आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात जगभरात जोरदार कमाई केली. एकीकडे बॉलिवूडच्या विरोधात बॉयकॉट ट्रेंड चर्चेत असताना ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर बाजी मारली. त्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या पुढच्या भागात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणार याची सोशल मीडियावर चर्चा होती. ज्यावर आता चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने प्रतिक्रिया दिली आहे.

‘ब्रह्मास्त्र’ प्रदर्शित झाल्यानंतर काही मीडिया रिपोर्ट्सनी ‘ब्रह्मास्त्र २’साठी अयान मुखर्जीने दीपिका पदुकोणला विचारणा केल्याचा दावा केला होता. दुसऱ्या भागात दीपिका अमृता म्हणजेच शिवाच्या आईची भूमिका साकारणार अशी चर्चाही होती. पहिल्या भागात लहानग्या शिवाला कुशीत घेतलेली एक महिला दिसते. जी अमृता आहे. प्रेक्षकांच्या मते ही झलक दीपिकाशी मिळती- जुळती आहे. पण आता या सर्व चर्चांवर अयान मुखर्जीने मौन सोडलं आहे. अंधारात दिसत असलेली सावली ही कोणाचीही असू शकते. असं त्याचं म्हणणं आहे.

आणखी वाचा- “शर्टचं बटन लावायला विसरलीस का?” जान्हवी कपूर पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

आणखी वाचा- शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा झळकणार एकत्र, ‘या’ चित्रपटात शेअर करणार स्क्रीन, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसण्याबद्दलच्या चर्चांवर अयान मुखर्जी म्हणाला, “पहिल्या भागातील ज्या सीनची सोशल मीडियावर एवढी चर्चा आहे. या सीनमध्ये दीपिका पदुकोण असल्याचं बोललं जातंय. तो एक अंधारात घेतलेला सीन आहे. या व्यक्तिरेखेचा चेहरा सीनमध्ये स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे लोकांचा अंदाज ही एक कल्पना आहे. त्यात अभिनेत्रीचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये.” म्हणजेच अयान मुखर्जीच्या म्हणण्यानुसार दीपिका ‘ब्रह्मास्त्र’चा भाग नाही किंवा ती ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसण्याची शक्यता नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या