scorecardresearch

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा झळकणार एकत्र, ‘या’ चित्रपटात शेअर करणार स्क्रीन, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

२५ जुलै रोजी या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा झळकणार एकत्र, ‘या’ चित्रपटात शेअर करणार स्क्रीन, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
bollywood actors

‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडला नवी ‘शांती’ मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. मॉडेल अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ‘गेहराइया’ चित्रपटात ती दिसली होती. नुकताच प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्रच्या पुढील भागात ती दिसणार अशी चर्चा आहे. नुकतेच तिने आपल्या आगामी चित्रपटाच्या डबिंगला सुरवात केली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात ती आपल्याला दिसणार आहे.

दीपिका या चित्रपटात शाहरुख खान, जॉन अब्राहाम यांचबरोबर झळकणार आहे. याबाबतची पोस्ट तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. तिने स्टुडिओमधला फोटो शेअर करत त्यावर कॅप्शन दिला आहे की #wip #pathan म्हणजेच पठाण चित्रपटाचे काम सुरु आहे. २५ जुलै रोजी या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते. ज्यात दीपिका हातातली बंदूक कॅमेरा दाखवत आहे.

गौरी खानबद्दल विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर शाहरुख म्हणाला, ‘मी अशा… ‘

या चित्रपटात शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘झिरो’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. शाहरुख खान आणि दीपिका दोघांनी याआधी ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेससारख्या चित्रपटात काम केलं आहे. तसेच दीपिकाने जॉनबरोबर ‘देसी बॉईज’ या चित्रपटात काम केलं आहे. आता पठाण चित्रपटात हे त्रिकुट पहायला मिळणार आहे. चाहतेदेखील या चित्रपटाची वाट बघत आहेत.

‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. मल्टीस्टारर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट हाय-ऑक्टेन अॅक्शन फिल्म असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सलमान खान एक छोटीशी भूमिका साकारणार आहे. यशराज प्रोडक्शनच्या आदित्य चोप्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या सुरू असलेल्या बॉयकॉटच्या मुद्द्यामुळे चित्रपटाचे नाव बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Work in progress deepika padukone begins dubbing for shah rukh khan s pathaan spg

ताज्या बातम्या