झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या शोला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. कलाविश्वासह विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होतात. सुबोध भावे आणि इतर महिला कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलेला प्रश्न विचारून बोलतं करतात. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात लोकप्रिय अभिनेत्री रिंकु राजगुरूने हजेरी लावली.

‘बस बाई बस’ शोमध्ये रिंकूने सगळ्याच प्रश्नांना दिलखुलास आणि मजेशीर पद्धतीने उत्तरे दिली. कार्यक्रमात रिंकूला “’सैराट’ चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे का?”, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत ती म्हणाली, “’सैराट २’ येणार की नाही याबद्दल मला माहीत नाही. शक्यतो नाही”. पुढे ती म्हणाली, “’सैराट’ चित्रपटाचा सिक्वेल येणार की नाही याबद्दल नागराज मंजुळे दादाच सांगू शकतील”.

हेही वाचा >> Video : अमृता खानविलकरसह ‘डोला रो डोला’ गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, करण जोहर म्हणाला…

हेही वाचा >> “लग्न करायचे म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने सांगितला ‘त्या’ चाहत्याचा भयानक किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटाने कोटींची कमाई केली होती. चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. याच चित्रपटातून रिंकूने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. रिंकूसह अभिनेता आकाश ठोसरने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं होतं. हिंदीसह अनेक भाषांमध्ये सैराट चित्रपटाचा रिमेकही करण्यात आला होता.

हेही पाहा >> Photos : ‘सैराट’मधील आर्चीचं खरं नाव माहीत आहे का? रिंकू नाही तर…

‘सैराट’ चित्रपटामुळेच रिंकूला प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली. १०० डेज या वेब सीरिजमध्ये रिंकूने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तासह स्क्रीन शेअर केली होती.