मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम सध्या त्यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग नुकतंच कान्स सोहळ्यात पार पडलं होतं. या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये भरभरून प्रेम मिळालं. याशिवाय चित्रपटाला उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आलं होतं. यानंतर या चित्रपटाने कान्स सोहळ्यात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. पायल कपाडियाच्या या चित्रपटाने महोत्सवात ऐतिहासिक कामगिरी करत ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. पाल्मे डी’ओर नंतर ‘ग्रँड प्रिक्स’ हा चित्रपट महोत्सवातील दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची झाली फसवणूक, संतप्त विदिशाने पोस्ट करत कलाकारांना केली ‘ही’ विनंती

पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटात कानी कुसरुती, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृदयू हारून यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय यंदा पाल्मे डी’ओर पुरस्कारावर ‘अनोरा’ चित्रपटाने आपलं नाव कोरलं आहे.

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ने रचला इतिहास

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’चा प्रीमियर २३ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला. गेल्या ३० वर्षांत महोत्सवाच्या मुख्य विभागात प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. १९९४ मध्ये शाजी एन करुण यांचा ‘स्वाहम’ हा कान्सच्या मुख्य विभागात पोहोचणारा शेवटचा भारतीय चित्रपट होता.

हेही वाचा : अवघ्या १० महिन्यांत मोडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्न; पतीच्या अफेअरबद्दल स्क्रीनशॉट्स केले शेअर

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ची कथा

पायल कपाडिया लिखित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ ही केरळमधील दोन नर्सेसची कथा आहे. कथेच्या केंद्रस्थानी नर्स प्रभा आहे, तिची भूमिका कानी कुसरुतीने साकारली आहे. दरम्यान, मराठमोळ्या छाया कदम या चित्रपटाचा भाग असल्याने सध्या मराठी कलाविश्वातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

कान्स २०२४ पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे…

पाल्मे डी’ओर- अनोरा
दिग्दर्शक: शॉन बेकर

ग्रँड प्रिक्स- ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’
दिग्दर्शक: पायल कपाडिया

ज्युरी पुरस्कार
एमिलिया पेरेझ

सर्वोत्तम दिग्दर्शक
मिगुएल गोम्स, ग्रँड टूर

विशेष पुरस्कार
मोहम्मद रसूलफ – द सीड ऑफ द सेक्रेड फिग

सर्वोत्कृष्ट अभिनेता
जेसी प्लेमन्स, काइंड्स ऑफ काइंडनेस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
एड्रियाना पाज, जो सलदाना, कार्ला सोफिया गैस्कॉन, सेलेना गोमेज