Chris Evans Back To MCU : मार्व्हलचे सिनेमे, त्यातील पात्र आणि ते पात्र साकारणारे कलाकार हे जगभरात अनेक प्रेक्षकांचे लाडके आहे. मार्व्हल सिनेमाचा ‘अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम’ सिनेमात मार्व्हलचे ‘आर्यनमन’, ‘कॅप्टन अमेरिका’, अशा अनेक पात्रांचा शेवट दाखवण्यात आला आहे. हे लोकप्रिय पात्र साकारणारे अभिनेते सुद्धा यानंतर प्रेक्षकांना मार्व्हल सिनेमात दिसले नाही यामुळे अनेक प्रेक्षक भावुक झाले होते. पण काहीच दिवसांपूर्वी आलेल्या बातमीतून ‘आयर्नमॅन’ची भूमिका साकारणारा रॉबर्ट डाउनी ज्युनियर लवकरच मार्व्हल सिनेमात पुनरागमन करणार आहेत. त्यापाठोपाठ आता प्रेक्षकांचे आवडते ‘कॅप्टन अमेरिका’ हे पात्र साकारणारा अभिनेता क्रिस एव्हान्स सुद्धा मार्व्हल सिनेमात पुन्हा दिसणार आहे.

क्रिस एव्हान्स जो आणि अँथनी रुसो (रुसो ब्रदर्स) दिग्दर्शित आगामी मार्व्हल चित्रपटात दिसणार आहे. ‘डेडलाईन’च्या अहवालानुसार, हा चित्रपट मार्व्हल सिनेमाच्या चाहत्यांना त्यांच्या काही आवडत्या पात्रांना पुन्हा पाहण्याची संधी देणार आहे. प्रेक्षकांना क्रिस एव्हान्सला ‘अ‍ॅव्हेंजर्स: डूम्सडे’ मध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे. क्रिस एव्हान्सच्या भूमिकेबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, अँथनी मॅकीचा सॅम विल्सन देखील कॅप्टन अमेरिकाच्या रूपात परत येणार असल्याचे सांगितले गेले आहे. क्रिस एव्हान्स ‘कॅप्टन अमेरिका’ची भूमिका साकारणार नाही, परंतु स्टीव्ह रॉजर्स या पात्राच्या रूपात त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बोलले जात आहे.

हेही वाचा…प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या

क्रिस एव्हान्सचा २०१९ मध्ये आलेला ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ हा ‘कॅप्टन अमेरिका’च्या भूमिकेतील शेवटचा मार्व्हल चित्रपट होता. या चित्रपटाने त्याच्या पात्राला एक भावनिक निरोप दिला. मात्र, अलीकडील घडामोडींमुळे चाहत्यांमध्ये त्याच्या पुनरागमनाविषयी उत्सुकता वाढली आहे. यावर्षी, क्रिस एव्हान्स ने ‘डेडपूल अँड वूल्व्हरिन’ मध्ये कॅमिओ केला होता, मात्र त्याने त्यात २०००च्या दशकातील ‘फँटॅस्टिक फॉर’ (‘Fantastic Four’) चित्रपटांमधील जॉनी स्टॉर्मची भूमिका पुन्हा एकदा साकारली होती.

‘अ‍ॅव्हेंजर्स: डूम्सडे’ मध्ये मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील अनेक लोकप्रिय पात्रे पुन्हा दिसणार आहेत, ज्यामध्ये अनेक मूळ अ‍ॅव्हेंजर्सचा समावेश आहे. याशिवाय, रॉबर्ट डाउनी ज्युनियर फ्रँचायझीत परत येणार आहे, परंतु यावेळी तो ‘डॉक्टर डूम’ या आयकॉनिक व्हिलनची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा…भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुसो ब्रदर्स, यांनी याआधी ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’, ‘कॅप्टन अमेरिका: द विंटर सोल्जर’, आणि ‘कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर’यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, ते ‘अ‍ॅव्हेंजर्स: डूम्सडे’ ला त्यांच्या अनोख्या शैलीने सजवणार आहेत. या चित्रपटात एक मोठी स्टारकास्ट असेल, ज्यामध्ये नवीन Fantastic Four चे कलाकार पेड्रो पास्कल, जोसेफ क्विन, व्हॅनेसा किर्बी, आणि इबॉन मॉस-बॅचराक — हे देखील अ‍ॅव्हेंजर्समध्ये सामील होऊन या मल्टी-युनिव्हर्सचा भाग बनतील. ‘अ‍ॅव्हेंजर्स: डूम्सडे’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे, त्यानंतर ‘अ‍ॅव्हेंजर्स: सिक्रेट वोर्स ‘ २०२७ मध्ये प्रदर्शित होईल.