श्रीदेवीच्या शोमध्ये बॅक डान्सर होती गीता माँ, म्हणाली “तेव्हा माझ्या करिअरची…”

‘सुपर डान्सर-४’ च्या मंचावर श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा

shridevi-geeta-kapoor

कोरिओग्राफर गीता कपूर गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच सिंदूरमधील फोटो व्हायर झाल्याने गीता माँ म्हणजेच गीता कपूर चांगलीच चर्चेत आली होती. ‘सुपर डान्सर ४’ च्या शोमध्ये अनेकदा गीता माँ भावूक झाल्याचंही पाहायला मिळतं. नुकत्याच एका एपिसोडमध्ये भूतकाळात डोकावत असताना गीता भावूक झाली. यावेळी तिने करिअरच्या सुरुवातीचा संघर्ष सांगितला.

‘सुपर डान्सर-४’ च्या यावेळीच्या एपिसो़डमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या लोकप्रिय गाण्यांवर स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत. यावेळी शोमध्ये श्रीदेवीची शोरील चालवण्यात आली. यावेळी अनेक जजेसने श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी गीता माँला तिचे जुने दिवस आठवले. ज्यावेळी गीता श्रीदेवींच्या शोमध्ये बॅक डान्सर म्हणून काम करायची.

गीता कपूर यावेळी म्हणाली, ” ही तेव्हाची गोष्ट आहे. जेव्हा मी करिअरला सुरूवात केली होती. तेव्हा मी श्रेदेवी यांच्यासोबत बॅक डान्सर म्हणून जायचे. शोवेळी त्या खूप शांत आणि एक्राग राहायच्या. त्यानंतर जान्हवी कपूरच्या सिनेमावेळी सेटवर आमची भेट झाली. मला पाहताच त्या जवळ आल्या. त्यांनी माझी विचारपूस केली. महान लोकांच्या या छोट्या छोट्या गोष्टींच त्यांना महान बनवतात. आपल्याला कितीही यश मिळालं तरी आपल्या सहकाऱ्यांना विचसरू नये हे देखील अशा लोकांकडून शिकायला मिळतं.” असं गीता माँ यावेळी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Florina Gogoi (@florina_gogoi___)

या खास एपिसोडमध्ये श्रीदेवी यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांवर स्पर्धकांनी दमदार परफॉर्मन्स देत त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी मलायका अरोराने देखील एक खास परफॉर्मन्स सादर केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Choreographer geeta kapoor she was back dancer in shridevi show in back dayes kpw