अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच ‘सिटाडेल’ या स्पाय थ्रिरल सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा या सीरिजमधील लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. या ट्रेलरला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.

MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेचीच हवा; सुंबूलबरोबर केला जबरदस्त डान्स, Video पाहिलात का?

kiran mane shared Janhvi Kapoor video
“बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये ‘गांधी-आंबेडकर’ यांच्याविषयी बोलताना कुत्सित…”, जान्हवी कपूरचा व्हिडीओ शेअर करत किरण मानेंचं वक्तव्य
Dinesh Karthik
IPL 2024: दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनीच्या छायेत आणि संधीच्या प्रतीक्षेत राहूनही स्वत:चं स्थान निर्माण करणारा लढवय्या
manoj bajpayee
दिल्ली आवडते की मुंबई? अभिनेता मनोज बाजपेयींनी त्यांच्या खास शैलीत दिलं उत्तर; म्हणाले…
Mahindra Bolero and Mahindra Bolero Neo
बाकी कंपन्यांना फुटला घाम! महिंद्राच्या ‘या’ स्वस्त ७ अन् ९ सीटर कारला दरमहिन्याला मिळतेय १० हजार बुकींग, किंमत…
Marathi Serial World First AI Experiment
मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
mira bhaindar mla gilbert mendonca marathi news
माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांची भूमिका अस्पष्टच, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत
tichi bhumika, Loksatta, special program,
दिग्गजांच्या नजरेतून ‘ती’च्या भूमिकांचा वेध; ‘लोकसत्ता’च्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध

‘सिटाडेल’ च्या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्राची दमदार अॅक्शन आणि थरारक कथा पाहायला मिळत आहे. अॅक्शन, थरार व रोमान्सने भरपूर ही सीरिज प्रेक्षकांना अमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे. उत्कंठावर्धक ट्रेलर पाहून चाहते ही सीरिज प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. तसेच काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून दूर असलेल्या प्रियांकाला या सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहता येणार आहे. या सीरिजला आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

“तुम्ही सनी देओलसारखे दिसता” अहमदनगरच्या शेतकऱ्याने अभिनेत्याला ओळखलंच नाही, व्हिडीओ व्हायरल

काय आहे ‘सिटाडेल’ची कहाणी

सिटाडेल नावाची जागतिक गुप्तचर संस्था म्हणजेच स्पाय एजन्सी आठ वर्षांपूर्वी पूर्णपणे नष्ट झाली आहे. ही एजन्सी लोकांचे संरक्षण करत असे, परंतु मॅन्टीकोरने ती नष्ट केली होती. सिटाडेल नष्ट होताना मेसन केन (रिचर्ड मॅडन) आणि नादिया सिंह (प्रियांका चोप्रा जोनास) हे त्याचे प्रमुख एजंट आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले आणि नवी ओळख निर्माण करून आयुष्य जगू लागले. परंतु एका रात्री बर्नार्ड ऑर्लिक (स्टॅनली टुसी), ज्याने पूर्वी मेसनबरोबर सिटाडेल इथं काम केले होते, तो त्याचा माग काढतो आणि सगळं अचानक बदलतं. मॅसनला मॅन्टीकोरला थांबवण्यासाठी नादियाची गरज असते आणि इथून एका नव्या मिशनला सुरुवात होते, अशी कहाणी या सीरिजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

यामध्ये स्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिलसारख्या कलाकारांसह रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास यांच्याही मुख्य भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रुसो ब्रदर्स AGBO आणि शो-रनर डेव्हिड वील यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. या सीरिजच्या २ एपिसोडचे प्रीमियर २८ एप्रिल रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होईल. यानंतर २६ मे पर्यंत दर शुक्रवारी एक नवीन एपिसोड प्रदर्शित केला जाईल.